चंद्रपुरात Vuenow कंपनीचे मोठे कारनामे उघड, तुमचीही गुंतवणूक आहे का?

February 10, 2026 by Prakash Hande

Vuenow Marketing Fraud News : चंद्रपूर :  गुंतवणुकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी Vuenow Marketing Services Limited आणि संलग्न कंपन्यांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात कंपनीचे संचालक, व्यवस्थापक व अन्य आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे. (चंद्रपुरात महिला तांदूळ मागायला आली आणि सोनं घेऊन पळाली)

 

प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी विविध कंपन्या स्थापन करून “Cloud Particle” या संकल्पनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून पैसे उभारले. दरमहा निश्चित भाडे किंवा नफा देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक स्वीकारण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात ही योजना फसवी असून गुंतवणूकदारांची रक्कम परत न करता आर्थिक अपहार केल्याचा आरोप आहे.

 

या प्रकरणात आतापर्यंत २५ लाखांहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले असून, आणखी गुंतवणूकदार पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, चंद्रपूर करीत असून आरोपींच्या मालमत्तेचा तपास, बँक खात्यांची पडताळणी तसेच गुंतवणूकदारांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. 

 

पोलिसांनी या प्रकरणी सुखविंदर सिंग खरीर, नरेश कुमार क्रिष्णन गोपाल, वीरेंद्र कुमार सुभाष भाटिया, नितीन श्रीवास्तव, विभूती शर्मा, भाग सिंग, निलेश कुमार, राजीव चौधरी यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. Vuenow Marketing Fraud News     

 

पोलीस प्रशासनाने नागरिकांना अशा आकर्षक गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेगावकर यांनी केले आहे.

Leave a Comment

+