पोंभुर्णा – कटर मशीन चोरी प्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत ही मशीन जप्त झाली. पोलिसांनी सांगितल्यानुसार, चोरीस गेलेल्या कटर मशीनची किंमत ५० हजार रुपये आहे. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. या प्रकरणी पोंभुर्णा ठाण्यात बीएनएस २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. पुढील तपास सुरू आहे. (बार मध्ये सुरु होता जुगार, पोलिसांची धाड पडताच जुगारी पळाले, वाचा बातमी)
चंद्रपूर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवत कटर मशीन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी चौघा संशयित आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीस गेलेला ५० हजार रुपये मूल्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कटर मशीन चोरी प्रकरण: नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन पोंभुर्णा येथे अपराध क्रमांक १८४/२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी व चोरीला गेलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गस्त घाजत असताना, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन पोंभुर्णा यांच्या संयुक्त पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेतला. संयुक्त पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनीच ही चोरी केली असल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून चोरीस गेलेली ५० हजार रुपये किमतीची कटर मशीन जप्त केली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी प्रमोद श्रीनिवास तोरे (वय ३०, रा. चिंतल धाबा, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर), चंद्रशेखर विठ्ठल कुळमये (वय ३६, रा. केमारा, ता. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर), राजकुमार घुंगरू मरसकोल्हे (वय ३६, रा. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) आणि सचिन दामोदर पेंदोर (वय ३८, रा. पोंभुर्णा, जि. चंद्रपूर) या चौघांना ताब्यात घेतले आहे. मूल उपविभाग, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) चंद्रपूर आणि पोंभुर्णा पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई पार पाडली असून, या यशस्वी कारवाईमुळे परिसरातील चोरट्यांचे धाबे दाणाणले आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






