पोंभुर्णा : पोंभुर्णा शेतकरी मृत्यू प्रकरणात देवाडा खुर्द येथील प्रकाश गणूजी बुरांडे (वय ६०) यांचा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे १० वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. मिळालेल्या माहितीनुसार ते कर्ज आणि नापिकीमुळे तणावाखाली होते. या घटनेने देवाडा खुर्द गावात हळहळ व्यक्त होत आहे. (किरकोळ वादात बाप-लोकांवर चाकू हल्ला, वाचा बातमी)
पोंभुर्णा शेतकरी मृत्यू: देवाडा खुर्दमध्ये हळहळ
सततची नापिकी, शेतीवरील कर्ज आणि आर्थिक विवंचनेमुळे देवाडा खुर्द येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. प्रकाश गणूजी बुरांडे (वय ६०) यांनी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते; मात्र चंद्रपूर येथे उपचारादरम्यान बुधवार (दि. २५ नोव्हेंबर) सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. शेतकरी आत्महत्येचे हे विदारक चित्र समोर आल्याने देवाडा खुर्द गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश बुरांडे हे शेतीसाठी घेतलेले कर्ज, पिकांचे नुकसान आणि सततच्या आर्थिक अडचणींमुळे प्रचंड तणावाखाली होते. मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना तातडीने पोंभुर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. (पोंभुर्णा शेतकरी मृत्यू)
पोंभुर्णा येथे प्राथमिक उपचार सुरू असतानाच त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. त्यामुळे बुधवार, २५ नोव्हेंबर रोजी पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, चंद्रपूर येथे उपचार सुरू असतानाच सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. प्रकाश बुरांडे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. कर्त्या पुरुषाच्या जाण्याने शेतकरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






