Rajura Jan Akrosh Morcha साठी राजुरा येथील काँग्रेस मोर्चाचे प्रतिनिधिक दृश्य

राजुरात २८ सप्टेंबरला काँग्रेसचा जन आक्रोश मोर्चा

User avatar placeholder
Written by Prakash Hande

सप्टेंबर 24, 2026

राजुरा – Rajura Jan Akrosh Morcha २८ सप्टेंबर २०२६ रोजी राजुरा येथे आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता भवानी माता मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होईल. त्यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर जाणार आहे. (महावितरणचे सेवा सेतू अभियान १७ ऑक्टोबरपर्यंत, वाचा महत्वाची बातमी)

Rajura Jan Akrosh Morcha : मोर्चाची सुरुवात कुठून होणार?

शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, बेरोजगार आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा उद्देश असल्याचे काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार, विरोधी पक्षनेते आमदार विजयभाऊ वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी १० वाजता भवानी माता मंदिर येथून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे.

शेतकरी प्रश्नांवर काँग्रेसच्या प्रमुख मागण्या

संपूर्ण राज्यात दुष्काळ जाहीर करून राजुरा विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानभरपाई व कर्जमाफी द्यावी, शेतमालाला कायदेशीर हमीभाव मिळावा, खते – बियाण्यांचा काळाबाजार थांबवावा, जिवतीतील सातबारा व फार्मर आयडीचे प्रश्न सोडवावेत, शेतकऱ्यांना अखंडित वीजपुरवठा द्यावा, लाडकी बहीण पोर्टल सुरू करून योजनेतील महिलांना न्याय देणे, नवीन नोंदणी सुरू करणे, महिलांना Ncmc कार्ड ची सक्ती नको, निराधारांना नियमित दरमहा आर्थिक मदत करणे तसेच स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर होणारा अतिरिक्त आर्थिक भार थांबवावा, ग्रामीण व शहरी भागातील खराब रस्ते तातडीने दुरुस्त करणे, घरकुल व सामाजिक सुरक्षा योजनांचे प्रलंबित लाभ तातडीने देणे, पेपरफुटीला आळा घालणे, स्थानिक बेरोजगारांना रोजगार, गॅस-पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीपासून दिलासा.

जातनिहाय जनगणनेत OBC समाजाची स्वतंत्र नोंद करावी आणि OBC, SC व ST समाजाचा निधी अन्य कामात खर्च करू नये, मुख्य निवडणूक आयुक्त श्री ज्ञानेश कुमार यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी तसेच त्यांना पदावरून त्वरित दुर करून त्यांच्या कार्यकालात मतदार याद्यांमध्ये झालेल्या फेरबदलाची स्वतंत्रपणे समिक्षा करण्यात यावी यासह जनहिताच्या विविध मागण्यांसाठी हा जन आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला असून शेतकरी, महिला, युवक, विद्यार्थी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment