चंद्रपूर :Shiv Sena Raincoat Distribution: शिवसेना, युवासेना आणि महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना ऊर्जनगर यांच्या वतीने खैरगाव येथे सामाजिक उपक्रम पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खैरगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्ष सौ. मनस्वी संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. महानिर्मितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राहुल बेले यांच्या नेतृत्वात ७० विद्यार्थ्यांना रेनकोट देण्यात आले. शिवसेना १०० टक्के समाजकारण या धोरणावर हा उपक्रम पार पडला. (हे हि वाचा – चंद्रपूर जिल्ह्यातील ७० हजार नागरिकांना मिळाले प्रॉपर्टी कार्ड)
या कार्यक्रमाला चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा सौ. मनस्वी संदीप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेना, महानिर्मितीचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राहुल बेले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम पार पडला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या समाजसेवेच्या विचारांचा आणि ‘१०० टक्के समाजकारण’ या भूमिकेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात पावसाळ्यात कोणतीही अडचण येऊ नये, या उद्देशाने गरजू विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला गजानन कोरडे, अमोल कोल्हे, शिवदास घुले, उज्ज्वल सोनवणे, जगदीश ढाले, पांडुरंग शेळके, शिवसेना उपतालुकाप्रमुख नितीन वंजाळ, युवासेना उपतालुकाप्रमुख अपूर्व खुलसिंगे, विभागप्रमुख निहाल देरकर, शाखाप्रमुख आर्यन पटोळे, उपशाखाप्रमुख समित आत्राम, शाखा समन्वयक धीरज मडावी, गटप्रमुख आशिष पिंगळे, बूथप्रमुख देवेश भोई, कृष्ण राऊत, वंश कुरेकर, वीरू बावणे, संघर्ष कांबळे यांच्यासह शिवसेना, युवासेना आणि महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






