Ballarshah Theft Incident बल्लारशाह पोलिसांत घरफोडीचा गुन्हा

बल्लारशाहमध्ये मुलगा बाहेर गेला अन् घरात शिरला चोर!

User avatar placeholder
Written by Prakash Hande

July 27, 2026

बल्लारशाह – Ballarshah Theft Incident: बल्लारशाह शहरातील झाकीर हुसेन वॉर्डात मध्यरात्री अज्ञात चोराने घरफोडी केल्याची घटना घडली आहे. या घरफोडीत चोराने एकूण १९ हजार रुपये लांबवले आहेत. या प्रकरणी बल्लारशाह पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिक काही वेळेसाठी घराबाहेर गेले असताना ही घटना घडली. चोराने आलमारीत ठेवलेला चिल्लरचा डबा आणि पर्स चोरून नेली आहे. (हे हि वाचा – कोंबड्यावर झुंजीचा जुगार महागात)

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश रमेश सदाफुले (वय ३४) हे आपल्या आई-वडिलांसह झाकीर हुसेन वॉर्डात राहतात. त्यांचे वडील रमेश सदाफुले यांना नेहमी चिल्लर पैसे जमा करण्याची सवय असल्याने त्यांनी जमवलेले चिल्लर पैसे एका स्टीलच्या डब्यात ठेवून तो डबा बेडरूममधील लोखंडी आलमारीत सुरक्षित ठेवला होता. २५ जुलैच्या रात्री आई गावाला गेलेली असल्याने गणेश हे बेडरूममध्ये तर त्यांचे वडील घरासमोरील हॉलमध्ये झोपले होते.

दरम्यान, २६ जुलै रोजी मध्यरात्री सव्वादोन वाजेच्या सुमारास गणेश यांना जाग आली असता ते प्रातर्विधी उरकून दुचाकीने फिरायला बाहेर पडले. घराबाहेर पडताना वडील हॉलमध्ये झोपलेले असल्याने त्यांनी समोरील दरवाजा व गेटला बाहेरून कडी लावली होती. त्यानंतर ते रेल्वे चौक परिसरात चहा पीत असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास त्यांच्या वडिलांनी फोन करून घरात चोरी झाल्याची माहिती दिली.

घराचे दोन्ही दरवाजे उघडे असून आलमारीतील चिल्लर पैशांचा डबा, ज्यामध्ये अंदाजे १०,००० रुपये होते, तसेच ९,००० रुपयांची नगदी असलेली पर्स असा एकूण १९,००० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे स्पष्ट झाले. गणेश यांनी तात्काळ घरी पोहोचून पाहणी केली असता आलमारी उघडी दिसून आली. मध्यरात्री २:१५ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोराने घरात प्रवेश करून ही घरफोडी केली.

गणेश सदाफुले यांच्या तक्रारीवरून बल्लारशाह पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०५(a) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार सत्यवान आनंदराव कोटनाके करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment