जिवती घरफोडी प्रकरणातील बंद घर आणि चोरीची रोकड दर्शवणारे प्रातिनिधिक दृश्य

जिवतीत बंद घरातून ६३ हजारांची रोकड चोरीला गेली

User avatar placeholder
Written by Prakash Hande

ऑक्टोबर 3, 2026

जिवती: जिवती घरफोडी प्रकरणात करणकोंडी येथे बंद घरातून ६३ हजार ८०० रुपयांची रोकड चोरीला गेली आहे. घरातील सदस्य बाहेर गेल्याची संधी साधून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. त्यानंतर अलमारीचे आणि स्टीलच्या डब्याचे कुलूप तोडण्यात आले. डब्यात ठेवलेली रोख रक्कम चोरीला गेल्याचे १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आले. या घटनेनंतर संदीप व्यंकटी लिंगमपल्ले यांनी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. (चंद्रपुरात वेश्याव्यवसाय, २ महिला दलालांना अटक, वाचा हि बातमी)

जिवती घरफोडी नेमकी कशी घडली?

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, करणकोंडी येथील रहिवासी संदीप व्यंकटी लिंगमपल्ले (वय २७) हे कुटुंबासह राहतात व जिवती येथे सलून दुकान चालवतात. दुकानात कामातून मिळणारे पैसे त्यांनी लोकांचे उधारी देणे फेडण्यासाठी मागील दोन-तीन महिन्यांपासून घरातील आलमारीतील स्टीलच्या डब्यात साठवून ठेवले होते. ३० सप्टेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे पैसे तपासून ते दुकानात गेले होते. यादरम्यान घरातील सर्व सदस्य वेगवेगळ्या कामासाठी बाहेर गेले असल्याने घर बंद होते. दुपारी घरच्या सदस्यांना दरवाजाच्या कुंडीचा एक खिळा निघालेला दिसला होता, मात्र त्यांनी तो ठोकून पूर्ववत केला.

त्यानंतर १ ऑक्टोबरच्या सकाळी दुकानाचे भाडे देण्यासाठी संदीप लिंगमपल्ले जुन्या घरातील अलमारीकडे गेले असता अलमारीचे आणि त्यातील स्टीलच्या डब्याचे कुलूप तोडलेले आढळले. डब्यात ठेवलेले ५०० रुपयांच्या ४५ नोटा (२२,५०० रु.), २०० रुपयांच्या २९ नोटा (५,८०० रु.), १०० रुपयांच्या ३२० नोटा (३२,००० रु.) आणि लहान नोटांची चिल्लर (३,५०० रु.) असा एकूण ६३,८०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे उघडकीस आले.

घर बंद असल्याचे पाहून अज्ञात इसमाने दरवाजाच्या कुंडीचा खिळा काढून आत प्रवेश केला व रोकड पळवल्याची खात्री पटल्यानंतर संदीप लिंगमपल्ले यांनी जिवती पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून जिवती पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३३१(३) आणि ३०५(a) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे करत आहेत.

📢 NEWS34 WhatsApp Channel

ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.

✅ Follow Now
Image placeholder

प्रकाश हांडे हे News34.in चे संपादक असून चंद्रपूर, गडचिरोली व विदर्भातील राजकारण, गुन्हेगारी, सामाजिक आणि स्थानिक घडामोडींवर वृत्तांकन करतात. पत्रकारिता क्षेत्रातील अनेक वर्षांचा अनुभव असून ते डिजिटल न्यूज आणि तपास वृत्तांकनात सक्रिय आहेत.

Leave a Comment