पोंभुर्णा – पोंभुर्णा तालुक्यातील फुटाणा चोरी प्रकरण सध्या चर्चेत आहे. एका शेतकरी कुटुंबाने घराच्या बांधकामासाठी साठवलेले ९० हजार रुपये घरातून चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. तक्रारीनुसार, फुटाणा येथील अमित परशुराम पोटे (वय २९) यांनी ही रक्कम घरातील टिनच्या डब्यात ठेवली होती. २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ती गायब झाली. या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (तेलंगणात चोरी चंद्रपुरात आरोपी, वाचा बातमी)
तालुक्यातील फुटाणा चोरी प्रकरण येथे एका शेतकरी कुटुंबाने घराच्या बांधकामासाठी साचवून ठेवलेली ९० हजार रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोराने लांबवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मूल पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुटाणा चोरी प्रकरण: नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फुटाणा चोरी प्रकरण येथील रहिवासी अमित परशुराम पोटे (वय २९) हे आपल्या आईसोबत शेतीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. यंदा घराचे बांधकाम करायचे असल्याने त्यांनी विविध मार्गांनी पैशांची जुळवाजुळव केली होती. हे सर्व पैसे त्यांनी घरातील पहिल्या खोलीत असलेल्या एका टिनच्या रिकाम्या डब्यात सुरक्षित ठेवले होते. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अमित आणि त्यांच्या आईने मिळून ९० हजार रुपये या डब्यात ठेवले होते.
४ नोव्हेंबरला मूल पोलीस ठाण्यात तक्रार
त्यानंतर १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सिमेंट बुक करण्यासाठी अमित यांनी आईकडे ३० हजार रुपयांची मागणी केली. आईने डबा उघडून पाहिले असता त्यात ठेवलेली सर्व रक्कम गायब असल्याचे निष्पन्न झाले. अमित यांनीही घरात जाऊन तपासणी केली असता डब्यातील ९० हजार रुपये मिळून आले नाहीत. २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत कोणीतरी अज्ञात इसमाने घरात शिरून टिनच्या डब्यातील रोख रकमेवर हात साफ केल्याची खात्री पटल्यानंतर, नातेवाईक व आजूबाजूला शोध घेऊनही पैसे न मिळाल्याने अखेर ४ नोव्हेंबर रोजी अमित पोटे यांनी मूल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीवरून मूल पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०५ अन्वये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणे निरीक्षक विजय रामकृष्णा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार इंदल रामराव राठोड करत आहेत.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now







