जटपुरा गेट वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी इको-प्रोचे “झोपा काढा सत्याग्रह”

अनोखे आंदोलन झोपा सत्याग्रह

News34 chandrapur चंद्रपूर : शहरात वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. जटपुरा गेट परिसरात तर वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक तसेच पादचाऱ्यानाही त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी या मागणीला घेऊन सोमवारी इको- प्रोच्या सदस्यांनी ‘झोपा काढा सत्याग्रह’ करीत शासन-प्रशासन व जनप्रतिनिधीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले आहे.   शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत … Read more

चंद्रपुरातील नगीनाबाग प्रभागात सिमेंट रस्त्यावर भ्रष्टाचाराचा भूकंप

Chandrapur politics news

News34 chandrapur चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नगीना बाग प्रभागातील स्वावलंबी नगर मधील गुलमोहर कॉलनी परिसरात तीन वर्षांपूर्वी सिमेंट रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, तीन वर्षांतच या रस्त्याला मोठे मोठे भेगा पडले आहेत. स्थानिक नागरिकांनी याबाबत आम आदमी पक्षाला तक्रार केली. त्यानंतर आम आदमी पक्षाने रस्त्याचा प्रत्यक्ष पाहणी करून त्याचा खुलासा केला आहे.   या रस्त्याला मोठे … Read more

ब्रह्मपुरीत सुरू झाली महिला कुस्तीपटूची दंगल

महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023

News34 chandrapur ब्रह्मपुरी – आधुनिक युगामध्ये जुन्या रूढी परंपराना तिलांजली देत सर्व क्षेत्रात स्त्री पुरुष समानतेने कार्य करीत असुन आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांनी देखील गगनभरारी घेतली आहे. हाच उदात्त हेतू साधत ग्रामीण महिला कुस्तीपटुंना वाव मिळावा याकरिता शिक्षणाची पंढरी असलेल्या ब्रम्हपुरी नगरीत राज्याचे विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने जिल्हा व तालुका कुस्तीगीर … Read more

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम जिवती येथे भूमिहीन शेतकऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण

भूमिहीन शेतकरी बेमुदत आमरण उपोषण

News34 chandrapur चंद्रपूर :- अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्टयांच्या प्रमुख मागण्या सह इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिवती तालुका भूमीहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वात ७ डिसेंबर 2023 पासून तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून अन्नत्याग आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. उपोषण कर्त्या शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली जात आहे आज … Read more

ओबीसी अन्नत्याग आंदोलनाचा चौथा दिवस, भीक मांगो आंदोलन

भीक मांगो आंदोलन

News34 chandrapur चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमुरच्या वतीने अन्नत्याग आंदोलनाच्या चौथ्या दिवशी ओबीसींच्या न्याय मागण्या अद्यापही मंजूर न झाल्याने भीक मांगो आंदोलन करून शासनाचा निषेध केला व आंदोलनात जमा झालेला निधी शासनाकडे जमा करणार आहेत.   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 सप्टेंबर ला चंद्रपुरात येऊन 20 दिवस चाललेल्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत आश्वासन … Read more

बडतर्फ कर्मचाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात बँकेचे संचालक आणि अधिका-यांना विनाकारण गोवण्याचा प्रयत्न – संतोष रावत

CDCC BANK CHANDRAPUR

News34 chandrapur गुरू गुरनुले मूल : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे काही संचालक, अधिकारी आदींच्या त्रासामुळे बडतर्फ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप निराधार असल्याचे मत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे.   जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मूल शाखेतील संचालक कक्षात स्थानिक पत्रकारांशी बोलताना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बालाजी नकटू … Read more

नागभीड येथील घोडाझरी तलावात मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

घोडाझरी तलाव नागभीड

News34 chandrapur प्रशांत गेडाम नागभीड- नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावावर मासेमारीसाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारला सांयकाळी ४.30 वाजताच्या सुमारास घडली. प्रमोद अर्जुन नान्हे वय-३० रा. नवानगर (नवखळा) ता.नागभीड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. नेहमीप्रमाणे घोडाझरी तलावात चार ते पाच व्यक्ती मासेमारीसाठी सांयकाळी ४ वाजताच्या सुमारास गेले होते. ट्युबवर बसून तलावात मासेमारीसाठी जाळे … Read more

चंद्रपुरात राष्ट्रीय लोकअदालतीत 2 हजार 679 प्रकरणे निकाली

लोक अदालत चंद्रपूर

News34 chandrapur चंद्रपूर :  राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या अध्यक्षा समृद्धी एस. भीष्म यांच्या मार्गदर्शनात ( दि. 9 डिसेंबर) चंद्रपूर जिल्हा न्यायालय तसेच  सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले … Read more

ब्रम्हपूरीत 10 डिसेंबर पासून रंगणार महिला महाराष्ट्र केसरी कुस्तीचा रणसंग्राम

Woman wrestling championship

News34 chandrapur ब्रह्मपुरी – ब्रम्हपूरी शहराचे शिक्षण व आरोग्य विषयक सोयींसाठी अवघ्या विदर्भात नावलौकिक प्राप्त आहे. मात्र ह्याच शहरात क्रिडा स्पर्धांना देखील मोठा वाव असुन येथील अनेक खेळाडूंनी विविध क्रिडा स्पर्धांमध्ये आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावर देखील मजल मारली आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर यावर्षी या शहरात राज्यस्तरीय महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन राज्याचे विरोधी … Read more

थाळी वाजवून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न

थाळी वाजवा आंदोलन

News34 chandrapur चिमूर – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा चिमूरच्या वतीने ओबीसी समाजाच्या विविध मागण्यासाठी दिनांक 7 डिसेंबर पासून अन्नत्याग उपोषण सुरू झाले. अन्नत्याग आंदोलनाला पाठींबा देत दिनांक 8 डिसेंबर पासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली. साखळी उपोषणाला भरपूर पाठिंबा मिळत असल्याने आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालय समोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आल्याने आंदोलन तीव्र होण्याच्या मार्गावर … Read more