वरोरा : वरोरा नायलॉन मांजा प्रकरणात वरोरा पोलिसांनी दत्तमंदिर वॉर्डातील एका घरावर छापा टाकून १२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित मांजा जप्त केला. हा छापा २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी टाकण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी विजय बालाजी कोहळे गल्लीबोळातून पसार झाला. फिर्यादीनुसार त्याच्याविरुद्ध वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. (कागदपत्रे घेत २ लाखांची खंडणी, गुन्हा दाखल, वाचा सविस्तर)
मानवी जीवित, मुक्या पक्ष्यांसह पर्यावरणासाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित नायलॉन मांजाची घरातच चोरून साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एका आरोपीचा डाव वरोरा पोलिसांनी उधळून लावला आहे. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी वरोरा शहरातील दत्तमंदिर वॉर्ड परिसरात टाकण्यात आलेल्या छाप्यात १२ हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त करण्यात आला असून, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी गल्लीबोळातून पसार झाल्याने त्याचा कसून शोध घेतला जात आहे. या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरोरा नायलॉन मांजा: दत्तमंदिर वॉर्डात पोलिसांचा छापा
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांच्या सुमारास वरोरा पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मनोज मारोतराव ठाकरे (ब.नं. १३९९) हे पोलीस उपनिरीक्षक मनीष तालेवार तसेच अंमलदार प्रशांत नागोसे, संदीप मुळे आणि विशाल राजूरकर यांच्यासोबत खाजगी वाहनाने पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रोव्हीशन, जुगार रेड, नायलॉन मांजा आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते.
दरम्यान, गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना ठोस माहिती मिळाली की, दत्तमंदिर वॉर्ड, वरोरा येथील विजय बालाजी कोहळे (वय ४०) हा पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा आपल्या घरात अवैध विक्रीसाठी साठवून ठेवत आहे. माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत दत्तमंदिर वॉर्ड चौकातून पंच म्हणून श्रेयस संजय कुमरे (वय २४, रा. मालवीय वॉर्ड, वरोरा) आणि किशोर रामहरी आत्राम (वय ४४, रा. जिजामाता वॉर्ड, बावणे ले-आउट, वरोरा) यांना सोबत घेतले आणि घटनेची माहिती देऊन सूचनापत्र दिले.
यानंतर पोलीस पथक व पंच विजय कोहळे यांच्या घराच्या दिशेने जात असतानाच घरासमोर एक व्यक्ती पोलीस आणि पंचांची चाहूल लागताच वेगाने पळू लागला. पंचांच्या मदतीने पळणारा इसम विजय कोहळे हाच असल्याची खात्री पटली; मात्र पोलिसांनी पाठलाग करूनही तो अरुंद गल्लीबोळाचा फायदा घेत निसटण्यात यशस्वी झाला. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत कोहळे यांच्या घरात प्रवेश केला असता तेथे त्यांची पत्नी कीर्ती विजय कोहळे आणि मुलगा आयुष कोहळे हे हजर आढळून आले. पोलिसांनी आपला व पंचांचा परिचय देत घरझडती घेण्याचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर पंचासमक्ष घराची कायदेशीर झडती घेण्यात आली.
या झडतीदरम्यान घराच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीत खडबड्याच्या खोक्यामध्ये विविध रंगांच्या प्लास्टिकच्या चक्रीवर गुंडाळलेला प्रतिबंधित नायलॉन मांजा धाग्याचे एकूण १२ गोलाकार कोन आढळून आले. या कोनवर ‘MONOKING GOLD NOT UST FOR KITE FLYING’ असे कागदी लेबल लावलेले होते. याबाबत कीर्ती कोहळे यांच्याकडे विचारणा केली असता, तो पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा प्रतिबंधित नायलॉन मांजा असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकी १ हजार रुपये प्रमाणे एकूण १२ हजार रुपये किमतीचे हे १२ नग पोलिसांनी पंचासमक्ष जप्त केले असून, त्यापैकी एक प्लास्टिक चक्री रासायनिक विश्लेषणासाठी कागदी लिफाफ्यात सीलबंद करण्यात आली. सायंकाळी ७ ते ७ वाजून ४५ मिनिटांदरम्यान पार पडलेल्या या संपूर्ण पंचनाम्याचे चित्रीकरण व छायाचित्रे मोबाईलमधील ई-साक्ष अँपद्वारे नोंदवून भारतीय साक्ष अधिनियम कलम ६३(४)(क) अन्वये प्रमाणपत्रही प्राप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित नायलॉन मांजा हा मानवी जीवाला, विशेषतः दुचाकीस्वारांच्या गळ्याला तसेच पक्ष्यांना आणि पर्यावरणासाठी जीवघेणा ठरत असल्याचे ठाऊक असतानाही, केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आरोपी विजय कोहळे याने त्याची साठवणूक व विक्रीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०१/२०२१ मधील आदेश, राष्ट्रीय हरित लवादाचा जुलै २०१७ चा आदेश तसेच महाराष्ट्र शासनाच्या २ मार्च २०२३ च्या राजपत्र अधिसूचनेनुसार नायलॉन तसेच चिनी मांजाच्या उत्पादन, विक्री, साठवणूक, पुरवठा आणि वापरावर कठोर बंदी लागू आहे.
या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस अंमलदार मनोज ठाकरे यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून २४ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ५१ मिनिटांनी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक १११६ अन्वये पाहिजे आरोपी विजय बालाजी कोहळे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २२३ व २९२ तसेच पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ च्या कलम ५ व १५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनीष जगन्नाथ तालेवार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
📢 NEWS34 WhatsApp Channel
ताज्या बातम्या सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp Channel ला Follow करा.
✅ Follow Now






