परस्पर समन्वय व सहकार्यातून बांबू क्षेत्राला पुढे न्यावे – व्ही. गिरीराज

News34

 

चंद्रपूर:- बांबू आधारित उदयोग-व्यवसायात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता असून शेतकरी, कारागीर, तंत्रज्ञासोबतच उद्योजक-व्यावसायिकांनी काळाची गरज असलेल्या बांबू क्षेत्राला परस्पर समन्वय व सहकार्यातून पुढे न्यावे असे मत महाराष्ट्र बांबू प्रवर्तन प्रतिष्ठान, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. गिरीराज यांनी व्यक्त केले.

ते चीचपल्ली येथील बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसच्या कार्यशाळा भेटी दरम्यान उपस्थित बांबू मित्र, बांबू कारागीर आणि बांबू शेतकरी यांच्याशी संवाद साधतांना बोलत होते. याप्रसंगी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अविनाश कुमार, वंडर ग्रासचे संचालक वैभव काळे, बांबू उद्योजक अजित टक्के, बांबूटेक ग्रिन सर्व्हिसेसच्या संचालिका अन्नपूर्णा धुर्वे-बावनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी व्ही. गिरीराज यांनी बांबू क्षेत्राशी निगडीत विविध विषयांवर चर्चा करून उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.

सादर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अन्नपूर्णा धुर्वे यांनी केले तर प्रास्ताविक अनिल दहागांवकर आणि आभार प्रदर्शन निलेश पाझारे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हाभरातील बांबूमित्र, बांबू शेतकरी, बांबू कारागीर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भास्कर शेरकी, सुरज सोनारकर, प्रज्वल बावणे, कल्पना शिंदे, दर्शन चाफले, पुष्पा सावसाकडे, भास्कर कांबळे, रवींद्र उपरे, शिवसागर चंदनखेडे, सुभाष मोहुर्ले, हेमराज धुर्वे, श्वेता बावणे, राजू नंदनवार, मधुकर डांगे, लक्ष्मण घुगुल, उमेश रामटेके, प्रवीण कावेरी, राहुल स्वामी, अभय रॉय, भूषण नंदनवार, प्रणित मारोटकर यांनी परिश्रम घेतले.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!