News34 road accident
बल्लारपूर – आजी आपल्या नातवाला सोबत घेत पेन्शन घेण्यासाठी दुचाकीवर निघाली होती, मात्र वाटेतच मृत्यूने त्यांना पाठीमागून धडक दिली, या धडकेत आजीचा मृत्यू झाला.
बल्लारपूर येथील रहिवासी लक्ष्मीबाई बंडेलवार व नातू नरसिंग कोंडा हे बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी एमएच 34_8320 क्रमांकाच्या अॅक्टिव्हाने राजुरा येथे जात होते. यादरम्यान दोघेही व्हीटीएस प्लॉटच्या वेलंकी पेट्रोल पंपाजवळ पोहोचले, त्याचवेळी मागून येणाऱ्या एमएच 34 बीजी 9131 क्रमांकाच्या ट्रकने अॅक्टिव्हाला धडक दिली.
त्यामुळे दोघेही रस्त्यावर पडले. दरम्यान नातू नरसिंग कोंडा याने ट्रकचालकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक चालक ट्रकसह पळून गेला. या अपघातात नातू किरकोळ जखमी झाला. दरम्यान, ट्रकने धडक दिल्याने आजी लक्ष्मीबाई बंडेलवार यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात पाठवला. काही वेळातच पोलिसांनी चालकाला अटक करून ट्रक जप्त केला.