भद्रावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 सप्टेंबर रोजी उमेदवारांची मुलाखत

News34

 

चंद्रपूर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भद्रावती येथे 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत आयटीआय शिल्प निदेशकांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्लंबर, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल (टेक्निकल स्कूल), मॅथ्स ड्रॉईंग आणि एप्लॉयबिलीटी स्कील याकरता तासिका तत्वावर नियुक्ती करण्यात येणार आहे.

डिप्लोमा, डिग्री, आयटीआय अधिक सीटीआयधारक व संलग्न ट्रेडचे उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. शैक्षणिक पात्रतेच्या माहितीकरीता www.dvet.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच उमेदवारांनी मूळ शैक्षणिक कागदपत्रांसह नमुद स्थळी व वेळी उपस्थित राहावे, असे भद्रावती येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य,श्रीमती. प्रणाली दहाटे यांनी कळविले आहे.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!