Monday, June 24, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये मिळालेला तो व्यक्ती कोण?

चंद्रपूर मनपा इमारतीच्या पार्किंग मध्ये मिळालेला तो व्यक्ती कोण?

चंद्रपूर पोलिसांनी केलं हे आवाहन

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील महानगरपालिका इमारतीच्या पार्किंगमध्ये पोलिसांना एक व्यक्ती झोपलेल्या अवस्थेत आढळला होता, पोलिसांनी त्या इसमाला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले, काही वेळांनी डॉक्टरांनी त्या इसमाला मृत घोषित केले.

9 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट दरम्यान कर्तव्यावर असताना शहर पोलीस स्टेशनचे पोउपनी किशोर मानकर यांना सकाळी 7.15 वाजे दरम्यान माहिती मिळाली की मनपाच्या पार्किंग मध्ये एक अनोळखी इसम झोपलेल्या अवस्थेत आहे.

पोलिसांनी तात्काळ पार्किंग मध्ये जाऊन बघितले असता त्याठिकाणी अंदाजे 50 वर्षीय पुरुष त्याच्या चेहऱ्यावर माशा लागून असलेल्या अवस्थेत होता, पोलिसांनी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले मात्र काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

मृतक इसमाचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे,

वय अंदाजे 50 वर्ष, रंग काळा, डाव्या हातावर गौतम बुद्धाचे गोदवलेले चित्र या वर्णनाच्या व्यक्तीला कुणी ओळखत असेल तर चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!