Saturday, September 23, 2023
HomeNews12 कोटींच्या घोळाने ताडोब्यातील ऑनलाइन बुकिंग सेवा बंद

12 कोटींच्या घोळाने ताडोब्यातील ऑनलाइन बुकिंग सेवा बंद

ऑफलाईन सफारी सुरू

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर – वाघांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा जंगल सफारीला घोटाळ्याचा फटका बसल्याने सध्या ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली आहे.

 

ताडोबा प्रशासनाने ऑनलाइन तिकीट बुकिंग चे कंत्राट वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या एजन्सी ला दिले होते, वर्ष 2021 ते 23 चे ऑडिट झाल्याने त्यामध्ये तब्बल 22 कोटी 80 लाख 67 हजार 749 रुपयांची तफावत आढळली, याबाबत एजन्सीला पैसे भरण्यास सांगितले असता त्यांनी 10 कोटी रुपये ताडोबा प्रशासनाकडे भरले मात्र उर्वरित 12 कोटी रुपये त्यांनी भरले नाही, ताडोबा व्यवस्थापनाने त्यांना वारंवार उर्वरित रकमेचा भरणा करण्यासाठी सांगितले मात्र त्यांनी पैसे भरले नाही, नेहमी शासनाला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, त्यामुळे ताडोबा व्यवस्थापनाने बुकिंग एजन्सीचे संचालक अभिषेक विनोदकुमार ठाकूर व रोहित विनोद कुमार ठाकूर या दोघांवर वन अधिकारी सचिन शिंदे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला.

कोर व बफर झोनची ऑनलाइन बुकिंग सेवा बंद

वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या तिकीट बुकिंग एजन्सीने my tadoba नामक वेबसाईट ची निर्मिती ताडोबा जंगल सफारीचा आनंद घेणाऱ्या पर्यटकांसाठी बनविली होती.

मात्र 12 कोटीच्या रकमेचा अपहार केल्याची चाहूल ताडोबा व्यवस्थापनाला लागल्याने त्यांनी my tadoba हे संकेतस्थळ बंद करण्याचा आदेश काढला व राज्यातील संपूर्ण व्याघ्रप्रकल्पाची एक वेबसाईट असणार त्यामधून ऑनलाइन बुकिंग होणार असे जाहीर केले होते मात्र ठाकूर बंधू ताडोबा व्यवस्थापनाच्या या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात गेले, न्यायालयाने ठाकूर बंधूंचे ऐकत ताडोबा व्यवस्थापनाच्या आदेशाला स्थगिती देत सदर निर्णय चंद्रपूर न्यायालय अंतर्गत घेण्यात यावा असे नमूद करीत जोपर्यंत निर्णय लागणार नाही तोपर्यंत ऑनलाइन बुकिंग बंद राहण्याचे निर्देश दिले.

ऑनलाइन बुकिंग बंद असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला, ऑगस्ट महिन्यापासून कोर झोन च्या जंगल सफारीसाठी पर्यटक बुकिंग प्रक्रिया पार पाडतात, सध्या बफर सफारी सुरू आहे मात्र ती सुद्धा ऑफलाईन पद्धतीने, ज्या पर्यटकांनी आधीच ऑक्टोबर महिन्यासाठी जंगल सफारी बुक केली असेल त्यांना कसलीही अडचण येणार नाही, जर अडचण आली तर त्यांनी ताडोबा व्यवस्थापणासोबत सम्पर्क साधावा असे आवाहन डॉ.जितेंद्र रामगावकर व्यवस्थापकीय संचालक ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प यांनी केले आहे.

येत्या 2 ते 3 दिवसात न्यायालयाचा निर्णय येणार आहे, शक्यतो ताडोबा प्रशासनाच्या बाजूने निर्णय लागणार त्यानंतर सर्व प्रक्रिया सुरळीत होणार आहे, जर निर्णयाला उशीर झाला तर आम्ही ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू करण्यासाठी पर्यायी मार्ग शोधू अशी माहिती रामगावकर यांनी दिव्य मराठी सोबत बोलताना दिली

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..