चंद्रपुरात आज मराठी सिने कलावंतांची उपस्थिती

News34

Meri Mati Mera Desh

चंद्रपूर  : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हास्तरीय ‘मेरी माटी मेरा देश’ व सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, जिल्हा प्रशासनाच्यावतीने सकाळी 11 वाजता डॉ. बल्लारपूर मार्गावरील ए.पी.जे अब्दुल कलाम उद्यान येथे जिल्ह्यातील 825 ग्रामपंचायती, 17 नगरपरिषद/ नगरपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थाकडून मातीचे कलश आणण्यात येणार असून उद्यानात अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे. शीलाफलकम, पंचप्राण शपथ, वसुधा वंदन अंतर्गत वृक्षलागवड, व विरो का वंदन अंतर्गत देशासाठी बलिदान दिलेले स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचा व जे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक हयात आहे, त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चांदा क्लब ग्राउंड येथे सायंकाळी 6 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक तसेच स्वातंत्र्य लढ्यावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रसिध्द अभिनेते सोनाली कुलकर्णी, श्रेयस तळपदे, पूजा सावंत व गायक नंदेश उमप या मराठी कलाकारांची उपस्थिती असणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमात जवळपास 300 लोकांचा ग्रुप सहभागी असून नाट्य, नृत्य व गायन आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांनुसार पंचप्रण शपथ नागरिकांना देण्यात येणार आहे.

त्यासोबतच सकाळी 9 वाजता महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समितीमार्फत हुतात्मा स्मारकापासून अमृत कलश रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!