कामगार आयुक्तांनी दिले पाणीपुरवठा कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आदेश

News34

चंद्रपूर – जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत काम करत असलेल्या 200 पेक्षा जास्त संख्या असलेल्या कामगारांचा किमान वेतनासाठी आणि कामगारांच्या सुरक्षेसाठी असलेल्या लढा अनेक वर्षापासून सुरू आहे.

पण काही महिन्यापासून डॉ अभिलाषा गावतूरे व भूमिपुत्र कामगार विंग यांनी जातीने लक्ष देत कामगारांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्या म्हणून शासनाकडे तसेच सहाय्यक आयुक्त कामगार विभाग यांच्याकडे कामगारांच्या महत्त्वाच्या प्रश्नांचा पाठपुरावा करीत आहेत व त्या कामगारांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत आणि त्याची फलश्रुती म्हणून आज सहाय्यक कामगार आयुक्त, चंद्रपूर तसेच कामगार, ठेकेदार व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक कामगार भावनात झाली आणि या बैठकीत कामगारांचे थकीत वेतन तीन दिवसाच्या आत देण्यात यावे, कामगारांना किमान वेतन मिळावे, कामगारांचे हजेरीपट बनवावे, तसेच त्यांना ओळखपत्र मिळावें ,काम करताना त्यांच्या सुरक्षिततेची सगळी काळजी घेण्यात यावी तसेच सुरक्षा किट मिळावी या मागण्या सहाय्यक कामगार आयुक्त व व सर्वांनी लावून धरली.

या बैठकीला भूमिपुत्र ब्रिगेड कामगार विग च्यावतीने राजेंद्रजी फूलझेले तसेच जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे श्रद्धा जयस्वाल सहाय्यक अभियंता , विलास भंडारी शाखा अभियंता , स्नेहा रॉय सहाय्यक अभियंता श्रेणी2 तसेच कंत्राटदार सुनील मोरे अविनाश मरते अंकुश वर्गनटीवार, तृप्ती चुनारकर तसेच ग्रामीण कामगार पाणीपुरवठा योजनेतील सर्व कामगार उपस्थित होते. दिलेल्या आदेशाची पूर्तता लवकरात लवकर करण्यात यावी असे सहाय्यक कामगार आयुक्त कडून बजावण्यात आले .अन्यथा जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यावर व कंत्राटदरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी ताकीद सहाय्यक आयुक्त यांच्याकडून देण्यात आली.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!