Tuesday, December 5, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्षाचा 16 वा बळी

मूल तालुक्यात शेतकरी ठार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

प्रतिनिधी | गुरू गुरनुले

मूल – चंद्रपूर जिल्ह्यात अनेक वर्षांपासून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे, वर्ष 2022 मध्ये 50 च्या वर वन्यजीव संघर्षात बळी गेले होते, यावर्षी सुद्धा मानव वन्यजीव संघर्षात आज 16 वा बळी गेला आहे.
यामध्ये 14 बळी वाघाच्या हल्ल्यात तर 2 बळी बिबट च्या हल्ल्यात झाले आहे.

 

शेतामध्ये पाणी पाहण्यासाठी गेलेल्या : शेतकऱ्या वर दबा धरुन बसलेल्या वाघाने जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता दरम्यान मूल तालुक्यातील मौजा ताडाळा तुकूम, जुना सोमनाथ परिसरातील शेतशिवारात घडली. सुर्यभाव टिकले वय 55 वर्षे रा. चिचाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे.

 

गेल्या दोन दिवसांपासुन मूल तालुक्यात मुसळधार पाऊस बरसल्याने संपुर्ण जनजिवण विस्कळीत झालेले आहे. दरम्यान मूल तालुक्यातील चिचाळा येथील शेतकरी सुर्यभान टिकले यांनी मौजा ताडाळा तुकुम शेतशिवारातील शेतात पाणी पाहण्यासाठी गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर झडप घेवुन एफ.डी.सी.एम.५२२ कक्षात शेतकऱ्यांचे तुकडे करुन जागीच ठार केले. नागरीकांना सदर घटनेबद्दल माहिती होताच घटनास्थळावर गर्दी केली.

 

सदर घटना शुक्रवारी सकाळी 7 वाजता दरम्यान घडली असून घटनेची माहिती वनविभागाला कळताच घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक आदेश शेडगे, आर. एफ .ओ. राजेश घोरुडे, पोलिस निरीक्षक सुमित परतेकी, सर्पमित्र पर्यावरण प्रेमी उमेश झिरे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, शिवसेना तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार व अनेक ग्रामस्थ तसेच क्षेत्र सहाय्यक खणके, मस्के, वनरक्षक राकेश गुरनुले, एफ.डी.सी. एम.चे कर्मचारी कूमरे, गवई, कर्मचारी दाखल झाले असुन वनविभागाच्या कर्मचाऱ्याकडुन मृत्यदेह शोधण्याचे काम युध्दपातळीवर सुरु केले आहे.

 

मृतदेह हाती लागताच उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन पाठविण्यात आले, वनविभागाने मृतक शेतकऱ्याच्या कुटुंबाला तातडीची 30 हजार रुपयांची मदत केली. परंतु शेतशिवांरातील वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे. यापूर्वी मौजा चीचाळा येथील गुऱ्हे चांरण्यासाठी नेलेल्या दोन इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular