Monday, June 24, 2024
Homeक्रीडामहाजनकोच्या सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेत चंद्रपूरचा अभिजित राज्यात दुसरा

महाजनकोच्या सहाय्यक अभियंता पदाच्या परीक्षेत चंद्रपूरचा अभिजित राज्यात दुसरा

कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता परीक्षेच्या निकालात अभिजित चे यश

- Advertisement -
- Advertisement -

News34

चंद्रपूर –  महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी द्वारा घेण्यात आलेल्या कनिष्ठ अभियंता व सहाय्यक अभियंता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत चंद्रपूरच्या अभिजित बाळकृष्ण धांडे याने दोन्ही पदाची परीक्षा पास होत सहाय्यक अभियंता पदाचे यादीत 180 पैकी 151 गुण घेऊन २ रा तर कनिष्ठ अभियंता पदाचे निवड यादीत 180 पैकी 149 गुण घेऊन ९ वा क्रमांक मिळविला आहे. या दुकानात मिळेल महागड्या वस्तू अगदी स्वस्त दरात

 

यानिमित्ताने प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष उमाकांत धांडे, किसान काँग्रेसचे शहर अध्यक्ष भालचंद्र दानव, साई सेवा संकल्प समितीचे विनोद गोवारदिपे यांनी त्याचे जुनोना रोड स्थित घरी जाऊन अभिनंदन केले.

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आधी बजाज पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग मध्ये पदविका व त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी चे शिक्षण घेणारा अभिजित बालपणापासून अभ्यासात हुशार आहे. पदविका परीक्षा देखील त्याने मेरिट मध्ये उत्तीर्ण केली होती. अभिजित चे आई, वडीलांनी खाजगी नोकरी करून मुलांना शिकविले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!