चंद्रपुर शहरात पुन्हा अपघात 1 मृत्यू 1 गंभीर

News34 accident chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहर आज भीषण अपघाताने हादरुन गेले, सकाळी शाळेत निघालेल्या शिक्षिकेच्या दुचाकीला भरधाव वेगात असलेल्या ट्रक ने धडक दिली, यामध्ये शिक्षिकेचा मृत्यू झाला तर सायंकाळी 7 साडेसात वाजता चंद्रपूर मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ दुचाकी स्लिप झाल्याने एक युवक जागीच ठार झाला.

सकाळी 10 वाजता जिल्हा परिषद शाळा लखमापूर येथे निघालेल्या शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकी वाहनाला ट्रक ने जोरदार धडक देत त्यांना फरफटत नेले, या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू झाला.

सायंकाळी साडे सात वाजता शहरातील आदर्श पेट्रोल पंप जवळ 2 युवक दुचाकी क्रमांक MH34BA9595 ने चंद्रपूर शहराच्या दिशेने भरधाव वेगात येत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने स्लिप झाली, यामधील एक युवक रस्त्यावर घासत गेला, त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला तर 1 युवक गंभीर जखमी झाला.

चंद्रपूर शहरात आज अपघाताच्या रुपात मृत्यूचे तांडव घडले, मात्र यामध्ये दोष कुणाचा? हा प्रश्न सर्वाना पडला असेलचं, कारण शहरात अनियंत्रित झालेल्या वाहतुकीवर नियंत्रण कुणाचे राहिले नाही.

शहरात आज अल्पवयीन मुलांचं टोळकं भरधाव वेगात वाहन चालविताना सहज आढळतो, महामार्गावरील ट्रक चा सुसाट वेग अपघाताचा अंदाज आपल्या दर्शवितो मग हे वाहतूक विभागाला का दिसत नाही?

वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शहरात वाहतूक व्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित झाल्याचे चित्र आज सर्वत्र दिसत आहे, आजचे 2 अपघात अनियंत्रित वाहतुकीचे उदाहरण असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!