चंद्रपूर शहरात एकाचं दिवशी 3 अपघात, 3 मृत्यू तर 1 गंभीर जखमी

News34 chandrapur city accident

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर ला सकाळपासून अपघातांचे सत्र सुरू झाले, या अपघातामध्ये तिघांचा बळी गेला तर 1 गंभीर जखमी झाला आहे.

शहरात सकाळी चंद्रपूर-नागपूर मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप जवळ 49 वर्षीय शिक्षिका अनिता ठाकरे यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ने धडक दिली, धडक बसल्यावर ती शिक्षिका खाली कोसळली आणि बघता बघता त्या शिक्षिकेचे डोके ट्रक च्या चाकात आले, या अपघातात शिक्षिका ठाकरे यांचा मृत्यू झाला.

सायंकाळी साडेसात वाजता चंद्रपूर-मूल मार्गावरील आदर्श पेट्रोल पंप जवळ झालेल्या अपघातात 1 युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा युवक गंभीर जखमी आहे.

हे 2 युवक चंद्रपूरच्या दिशेने भरधाव वेगात येत होते, आदर्श पेट्रोल पंप जवळ येताच युवकांचा दुचाकीवरून नियंत्रण सुटले असता दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली.

या अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या युवकाच्या डोक्याला जबर मार लागला आहे.

या अपघातातनंतर काही वेळात पुन्हा चंद्रपूर-मूल मार्गावर अपघात झाला या अपघातात एकाचा मृत्यू झाला.

भास्कर सातपुते राहणार कोंढाळा-घुग्गुस असे मृतकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भास्कर पायी जात असताना त्याला मागून येणाऱ्या एका ऑटोने एसपायर अकॅडमी नेहरू नगर मूल रोड येथे जोरदार धडक दिली. यात भास्करचा जागीच मृत्यू झाला. धडक देऊन आटो पसार झाला असून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहे.

चंद्रपूर शहरात 4 सप्टेंबर रोजी घडलेल्या अपघात सत्रामध्ये भरधाव वाहनांमुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला, चंद्रपूर वाहतूक नियंत्रण शाखेत 2 पोलीस निरीक्षक असताना सुद्धा शहरातील वाहतूक अनियंत्रित कशी? हा मोठा प्रश्न आहे.

शाळा सुटल्यावर शहरात अल्पवयीन बाईक रायडर्स चा धुमाकूळ सुरू होतो, सायंकाळी दारू पिऊन वाहन चालविणार्याची संख्या सुद्धा मोठी आहे.

भरधाव वेगात वाहन चालविणारे चंद्रपूर वाहतूक शाखेला दिसत नाही काय? कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी वाहतूक पोलीस सज्ज असतात मग भरधाव वेगात धावणाऱ्या वाहनांवर कारवाई का होत नाही? वाहतूक शाखेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कुणाचं नियंत्रण नाही का?

जर वाहतूक पोलीस असेच कार्य करीत राहली तर भरधाव वेगात धावणारे वाहन व होणारे अपघात हे कधीच थांबणार नाही हे विशेष.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!