News34
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील वडगाव पोलीस चौकीच्या आवारात काही बाहेरील लोकांनी अवैध पद्धतीने अतिक्रमण केले आहे. यामुळे पोलीस चौकीच्या कामकाजास अडचणी निर्माण होत आहेत. नागरिकांनी याबाबत मनपाला तक्रार केली आहे. मनपाने यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम आम आदमी पक्षाने दिला आहे.
वडगाव पोलीस चौकी ही मागील 25 ते 30 वर्षापासून नागरिकांच्या सेवेत आहे. या पोलीस चौकीच्या आवारात काही बाहेरील लोकांनी ठेले, शेड टाकून आपली दुकाने थाटून बसली आहेत. यामुळे पोलीस चौकीच्या आवारात गर्दी वाढते आणि नागरिकांना पोलीस चौकीत जाण्यासाठी अडचणी येतात. वडगाव पोलीस चौकीच्या आवारात काही बाहेरील लोकांनी अवैध पद्धतीने अतिक्रमण केले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. याबाबत नागरिकांनी मनपाला तक्रार केली आहे.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, “वडगाव पोलीस चौकी ही नागरिकांच्या हक्काची जागा आहे. या जागेवर कोणतेही अतिक्रमण होऊ देणार नाही.
मनपाने त्वरित कारवाई करून अतिक्रमण हटवावे. “मनपाने यावर त्वरित कारवाई न केल्यास आंदोलन करण्यात येईल, असा अल्टिमेटम आम आदमी पक्षाने दिला आहे या वेळेस आप चे ज्येष्ठ नेते सुनिल मुसळे,जिल्हा सचिव संतोष डोरखंडे,महानगर अध्यक्ष योगेश गोखरे,सचिव राजू कुडे, महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, सहसंगठण मंत्री सिकंदर सागोरे,उपाध्यक्ष सुनिल सदभया, ऍड तबसुम शेख,सह सचिव सुधीर पाटील, कोषाध्यक्ष स्वप्नील घागरगुंडे, तुकूम प्रभाग 1 संघटन मंत्री भिमराज मेंढे,नागसेन लाभणे,सुजित चेटगुलवार,विजेंदर सिग गील सरदार,दिलीप तेलंग, जितेंद्र भाटिया, श्रेयस वैरागडे, शुभम बावणे व इत्यादी उपस्थित होते.