चंद्रपुरातील रस्त्यावर वाहन धारकांची दादागिरी

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या वाहनांची संख्या चिंतेची बाब बनली आहे, शहरातील मुख्य मार्गावर नागरिक कमी आणि वाहने जास्त फिरत असल्याचे चित्र नजरेत पडत आहे.

 

चंद्रपूर शहरात वाहतूक व्यवस्था सध्या पूर्णतः कोलमडली आहे, मुख्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला वाहनांची गर्दी आपल्या नजरेत रोज पडते, मात्र हे मानवाद्वारे केलेले अतिक्रमण वाहतूक विभागाला दिसत नाही काय?

 

अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट दरम्यान हजारो वाहने दररोज ये-जा करतात, सकाळी 11 व सायंकाळी 5 वाजेदरम्यान मुख्य मार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते, वाहनांना गाडी पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे केल्या जाते.

 

वाढत्या अनियंत्रित वाहतुकीवर सध्या शासन प्रशासनातील अधिकारी गंभीर दिसत नाही, मुख्य मार्ग तर सोडा शहरातील ज्युबिली शाळा चौक ते जयंत टॉकीज या मार्गावर 4 चाकी वाहन मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कडेला असतात, हा मार्ग आपत्कालीन सेवेसाठी वापरला जातो, विशेषतः शासकीय रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला हा एकमेव सोपा मार्ग आहे मात्र यावर सुद्धा वाहन धारक अतिक्रमण करून ठेवतात.

 

या वाहन अतिक्रमनावर वाहतूक विभागाने कारवाई करीत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, चंद्रपुरातील रस्ते कुणाचे हा News34 चा पहिला भाग आहे, शहरातील अनेक समस्या आता आम्ही आपल्यासमोर घेऊन पुन्हा नक्की येऊ….तोपर्यंत नियमित वाचत रहा News34…

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!