News34 chandrapur
(प्रशांत गेडाम)
सिंदेवाही- सिंदेवाही तालुक्यातील कच्चेपार येथील तलावात मासे पकडायला गेलेल्या तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना आज 13 सप्टेंबर ला बुधवारी सकाळी 7-30 वाजताचा सुमारास उघडकीस आली आहे.
मृतक नाव प्रफुल देविदास मेश्राम वय -34 वर्ष, रा. कच्चेपार ता. सिंदेवाही, असे असुन हा डाव्या पायाने व डाव्या हाताने अपंग असुन तो वस्तीमधील मित्रांसोबत सोबत कच्चेपार गावाशेजारी असणाऱ्या गाव तलावात मासे पकडण्यास गेला होता. मासे पकडण्याकरिता मृतक प्रफुल मेश्राम व त्याचे सोबती तलावात मच्छिमारीचे जाळे टाकुन तलावात उतरले व मासे पकडु लागले.
प्रफुल मेश्राम हा मासे पकडण्याकरिता तलावाच्या खोल पाण्यात गेला परंतु तो डाव्या हाताने व डाव्या पायाने अपंग असल्याने व त्याला पोहता येत नसल्याने तो तलावाचे पाण्यात बुडुन मरण पावला.
मृतकाच्या भावाने तोंडी रिपोर्ट वरुन सिंदेवाही पोलीसांनी सदरचा मर्ग दाखल करून तपासात घेतला आहे, मृतदेह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले आहे पुढील तपास सिंदेवाही चे ठाणेदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदेवाही पोलीस करीत आहेत.