News34 chandrapur
चंद्रपूर – 24 तासामधून दररोज तब्बल 18 तास बंद राहणाऱ्या बाबूपेठ रेल्वे फाटकाचा त्रास आता संपणार आहे, कारण रेल्वे उड्डाणपूलाचे काम आता निम्मे राहिले असून येत्या काही महिन्यात बाबूपेठ मधील नागरिक उड्डाणपूलावरून जाणार आहे. Babu peth railway flyover
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बाबूपेठ उड्डाणपुलाचे भूमिपूजन तब्बल 7 वेळा करण्यात आले होते, मात्र अधिकृत उदघाटन व्हायला बराच कालावधी लोटून गेला.
भूमीपूजन झाल्यावर सुद्धा संथगतीने या उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू होते, कासवगतीने आपला प्रवास पूर्ण करीत हा रेल्वे उड्डाणपूल आता अंतिम टप्प्यात आहे.
13 सप्टेंबर ला रेल्वे विभागाने चांदा फोर्ट व मुख्य रेल्वे लाईन वरून उड्डाणपूल यशस्वीरीत्या क्रॉस केले.
येत्या 2 ते 3 महिन्याच्या आत उड्डाणपूल वरील रस्त्याचे काम पूर्णत्वास येणार आहे, मागील अनेक वर्षपासून बाबूपेठ रेल्वे उड्डाणपूलाची मागणी नागरिकांनी केली होती मात्र राजकीय वरदहस्त आलेल्या विशेष व्यक्तीचे दुकान वाचविण्यासाठी अनेकदा उड्डाणपुलाचा प्रस्ताव नाकारल्या गेल्या होत्या.
मात्र काही वर्षांपूर्वी विशिष्ट व्यक्तीचे दुकान प्रशासनाने वाचविले मात्र दुकान वाचले म्हणून शासनाने गरिबांचे कंबरडे मोडून टाकत त्यांच्या घरावर बुलडोजर चालविला, उड्डाणपुलाचे काम सुरू झाले, मागील 4 वर्षांपासून ते काम सतत सुरू आहे, कधी निधीची अडचण तर कधी रेल्वेची या गुंतागुंतीत काम संथगतीने सुरू होते.
या कालावधीत दाताला ब्रिज तयार होऊन सुरू सुद्धा झाला मात्र नेहमीप्रमाणे बाबूपेठ वर संथगतीच्या कामामुळे अन्याय झाला.
4 वर्षांनी काम अखेर पूर्णत्वास येत आहे, आता बाबूपेठ वासी रेल्वे फाटकाला लवकरच राम राम करतील यावर शंका नाही.