Friday, June 14, 2024
Homeचंद्रपूर शहरअल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या

चंद्रपूर जिल्हा युवतीसेने ने दिले निवेदन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चंद्रपूर युवासेना आक्रमक झाली आहे, जिल्ह्यात अश्या घटना वारंवार घडत आहे, विशेष म्हणजे ओळखी मधील असलेले या घटनेत कित्येकदा आरोपी असतात.

 

जानकापूर नागभीड येथे एका सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला ही घटना 10 सप्टेंबर रोजी रविवारी घडलेली घटना आहे.

 

घरी कोणी नसताना बघून त्यांच्याच ओळखीच्या 52 वर्षीय सुधाकर महादेव निमगडे या इसमाने वेळेची संधी साधून सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला. मुलीच्या घरच्यांनी आरोपी विरोधात सावरगाव नागभीड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.

 

युवासेना राज्य सहसचिव व युवासेना युवती जिल्हाधिकारी चंद्रपूर रोहिणी विक्रांत पाटील यांनी आज युवासेना युवतीकडून चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारा विरोधात आरोपीला कठोर कारवाई करून शिक्षा व्हावी या संदर्भात डेप्युटी एस पी मॅडम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.

यावेळी उपजिल्हा युवती अधिकारी धनश्री हेडाऊ, विपश्यना मेश्राम, उपजिल्हा समन्वयक संतुष्टी बुटले ,युवती विभाग अधिकारी काजल मडावी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!