Saturday, September 23, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात 15 व 16 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस

चंद्रपूर जिल्ह्यात 15 व 16 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस

15 आणि 16 सप्टेंबर रोजी जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर : नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार दिनांक 14 ते 18 सप्टेंबर 2023 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यासाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार दिनांक 15 ते 16 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला असून या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र हल्का ते मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्याता वर्तवली आहे.

खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरीकांनी पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी.

◆ संरक्षणात्मक कपडे घाला आणि घरात आश्रय घ्या. ◆ मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असताना खिडक्या आणि दरवाज्यापासून दूर रहा. ◆ रोडवे अंडरपास, ड्रेनेजचे खड्डे, सखल भाग आणि जिथे पाणी साचते अशा भागातून जाणे टाळा. ◆ खराब दृश्यपमानतेमुळे मुसळधार पावसात वाहने चालवणे टाळा. ◆ पूर आलेला रस्ता ओलांडून गाडी चालवण्याचा प्रयत्न करू नका. पाणी दिसते त्यापेक्षा खोल आणि मजबुत असू शकते आणि त्यात मोडतोड, तीक्ष्ण किंवा धोकादायक वस्तू, भांडे, छिद्र किंवा विजेच्या  तारा असू शकतात. ◆ पॉवर लाईन्स किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा. ◆ फ्लॅश पूर चेतावणी किंवा विजेच्या तारांपासून दूर रहा.

 

वादळ, मेघगर्जना आणि आकाशात विजा चमकत असताना काय करावे आणि काय करू नये

◆ विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. ◆ जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. ◆ आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. ◆ आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. ◆ तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.◆ आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. ◆ शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसीनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. ◆ विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. ◆ उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. ◆ धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे राहू नका. ◆ जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी उचित काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

हा काय फालतुपणा आहे? बातमी लिहायला शिका..