पोळ्याच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात घडली दुर्दैवी घटना

News34 chandrapur

चंद्रपूर – नांदा फाटा/ नांदा गावाजवळून वाहत असलेल्या नाल्यावर पूल बांधून देण्यात यावे यासाठी मागील पंधरा ते वीस वर्षापासून येथील शेतकरी बांधव व प्रतिष्ठित नागरिक शासन दरबारी पायऱ्या झिजवीत आहे.

 

अनेक राजकीय नेते आमदार खासदार पदाधिकारी अनेकांनी या मागणीला घेऊन केवळ निवडणुकीपुरते मता पुरते राजकारण करत पुलाच्या बांधकामाच्या श्री गणेशाचा नारळ फोडून केला तत्कालीन आमदार वामनराव चटप यांनी सदरील पूल मंजूर सुद्धा करून आणले मात्र त्यानंतर सत्ता बदल झाला व पुलाची मागणी हवेत विरली तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक आमदार खासदार आले अनेकांनी नारळ फोडले मात्र पूल काही झाले नाही.

 

पुलाकरिता तांत्रिक निधी अंदाजपत्रकानुसार मंजूर झाल्याचेही अनेकांनी सांगितले मात्र पुलाअभावी मागील पंधरा दिवसापासून नाल्याच्या पलीकडील परिसरात शेती असलेला शेतकरी आपल्या शेतात सुद्धा जाऊ शकत नाही आहे पोळ्याचा दिवस असल्यामुळे नांदा येथील शेतकरी किसान चौधरी हे आपल्या शेतातील बैलबंडी आणण्याकरिता पलीकडे गेले त्यावेळी परत नाला ओलांडत असताना त्यांची बैलबंडी पुराच्या पाण्यात वाहून गेली शेतकरी कसा बसा आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून बाहेर पडला मात्र बैलबंडी वाचवू शकला नाही.

मागील वर्षीच्या पावसाळ्यात सुद्धा अशा असंख्य घटना या नाल्याच्या पाण्यात घडल्या मात्र वारंवार निवेदना तक्रारी देऊन सुद्धा कसल्याही प्रकारचा न्याय येथील शेतकऱ्यांना मिळत नाही आहे की शेवटी प्रशासन हे मोठ्या जीवितहानीची वाट बघत आहे असाच प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला असून पुलाची मागणी ही कधी पूर्णत्वास जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. पोळा हा सण शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सर्वात महत्त्वाचा सण असतो ज्या दिवशी वर्षभर शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैलांना सकाळपासून विविध शृंगार करून सजविले जाते मात्र नांदा येथील नाल्याच्या पलीकडे असलेल्या शेतकऱ्यांना आपली जनावर नाल्याला पूर आल्यामुळे घरी आणता सुद्धा आली नाही.

 

याशिवाय या जनावरांचे दुसरे दुर्दैव काय असू शकते अनेक शेतकरी पाणी कमी होईल या आशेने नाल्याच्या पलीकडच्या तीरावर पाण्याच्या उतरण्याची वाट बघत उभे आहे असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले कदाचित या नाल्यावर पूल बांधला गेला असता तर या जनावरांना आणि शेतकऱ्यांना पोळा या सणाला मुकावे लागले नसते.

 

गावातील सुशिक्षित शेतकरी बांधवांनी आता कंबर कसायला सुरुवात केली आहे एवढेच नव्हे तर पोळा भरणाऱ्या परिसरात मध्यवर्ती ठिकाणी नाल्यावरील पुलाची आवश्यकता दर्शवणारे बॅनर सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले त्यामुळे आता राजकारणी व शासन याकडे कोणत्या दृष्टीने बघते हेही तेवढेच महत्त्वाचे आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!