News34chandrapur रमेश निषाद
बल्लारपूर – आगामी सण, सोहळा, उत्सव निमित्त शांतता समितीची बैठक बल्लारपूर पोलिस ठाण्यात शुक्रवार दि.०१ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.
नियमाप्रमाणे या बैठकीत शहरातील व्यापारी,सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश असतो. मात्र,यंदाच्या या शांतता समितीच्या बैठकीत
शहरातील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. कॅमेरा, लॅपटॉप, मोबाईल व असंख्य वस्तूंचा खजिना, खरेदी करा अमेझॉन वरून
मात्र,यंदा प्रथमच या बैठकीत पत्रकारांना डावलण्यात आले. सन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण असणाऱ्या या बैठकीत स्थानिक पत्रकारांना डावल्यामुळे उपस्थित मंडळीही काही वेळासाठी अचंबित झाली.
डावण्याच नेमक कारण काय? हे बैठकीत उपस्थित असणाऱ्या अनेकांना पडला आहे.
वेळ प्रसंगी प्रशासनाला जाब विचाराने आणि गरज पडल्यास प्रशासनाला धारेवर धरून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारानाचं या बैठकीत डावलने हा विसर असावा कि जाणीवपूर्वक केलेली कृती असा प्रश्न सध्या शहरात वर्तविला जात आहे.