News34
चंद्रपूर – जिल्ह्यातील बल्लारपूर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या कळमना उपक्षेत्रात वन कर्मचारी गस्तीवर असताना 2 वाघांचे बछडे त्यांना मृतावस्थेत आढळले व एका बछड्याला वनविभागाने रेस्क्यू केले.
7 सप्टेंबरला वन कर्मचारी कळमना उपक्षेत्रातील वनखंड क्रमांक 572 मध्ये एक वाघाचा अशक्त बछडा आढळला, त्यानंतर परिसरात शोध मोहीम राबविली असता 2 वाघांचे बछडे मृतावस्थेत आढळले.
अशक्त वाघाला वनविभागाने रेस्क्यू करीत त्याला वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात आणले आहे, सदर बछडा हा मादी असून त्याचे वय अंदाजे 5 महिने आहे.
मृत वाघांचे बछडे ताब्यात घेत शवं विच्छेदन करीता पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत नेमकी माहिती मिळेल.
वन विभागानुसार सदर बछडे हे वाघिणीसोबत असल्याची माहिती आहे, मात्र वाघीण शिकार करण्यासाठी गेली असल्याने हे बछडे भरकटले असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, सध्या वनविभाग वाघिणीचा शोध घेत आहे.
सदर प्रकरणाचा तपास श्वेता बोड्डू उपवनसंरक्षक मध्य चांदा, शेख तौसिफ शेख हैदर सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नरेश भोवरे वनपरिक्षेत्र अधिकारी बल्लारपूर करीत आहे.