News34
चंद्रपूर – सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटला आहे, मराठा समाजाला ओबीसी समाजातून कुणबी प्रमाणपत्र द्वारे आरक्षण देण्याचा डाव सुरू आहे, त्याला हाणून पाडण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे चंद्रपूर शहरात ओबीसी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठा समाजाला जर कुणबी प्रमाणपत्र दिल्यास सर्व ओबीसी जाती संघटनेवर त्याचा परिणाम पडण्याची शक्यता आहे, याकरिता मराठा समाजाला आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही, मराठा समाजाला आरक्षण द्यावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता त्यांना सरकारने आरक्षण बहाल करावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यापूर्वी केली होती.
मात्र सरकार त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी हालचाल करीत आहे त्यामुळे ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहचू शकतो, यावर आता ओबीसी समाजाने जागृत व्हावे यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे चंद्रपूर शहरात 8 सप्टेंबरला सरदार पटेल महाविद्यालय जवळील IMA हॉल मध्ये ओबीसी महापंचायतीचे आयोजन सायंकाळी 4 वाजता करण्यात आले आहे.
या महापंचायतीमध्ये ओबीसी समाजातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सचिन राजूरकर महासचिव राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी संघटना व सर्व जातीय संघटनांनी केले आहे.