Friday, June 14, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपूर परिमंडळात वीजबिल थकबाकी 488 कोटी 26 लाख

चंद्रपूर परिमंडळात वीजबिल थकबाकी 488 कोटी 26 लाख

29 हजार 371 वीज ग्राहकांचा पुरवठा खंडित

- Advertisement -
- Advertisement -

News34 mseb

चंद्रपूर – जुलै २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये चंद्रपूर परिमंडळातील चंद्रपूर व गडचिरोली ज्ल्हियातीतील तब्बल ४८ हजार ६१५ थकबाकीदारांना बत्ती गुल होण्याचा झटका बसला. यात ३४ हजार ८६६ तात्पुरत्या स्वरुपात तर १३ हजार ७४९ थकबाकीदार ग्राहकांचा कायमस्वरुपी वीजपुरवठा थकबाकीसाठी ख्ंडीत करण्यात आला.

 

जुलै व ऑगस्ट २०२३ या दोनच महिण्यात ३ हजार १०३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्यात आला. वीजेशिवाय राहता न आल्यामुळे १७ हजार ५८८ ग्राहकांना पूणर्जोडणी शुल्क भरणा करुन वीजपुरवठा लगेच सुरळीत करुन घेतला. चंद्रपूर जिल्हयातील २९ हजार ३७१ तर गडचिरोली जिल्हयातील १९ हजार २४४ ग्राहकांचा वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची कारवाई करण्यात आली.

 

महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना ईत्यादिंची थकबाकी ४८८ कोटी २६ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून महावितरणची आर्थिक स्थिती समजून घेवून ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांनी केले आहे.

 

चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन २० कोटी २१ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ५ कोटी ३० लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन ३ कोटी २८ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३ कोटी ३३ लाख येणे आहे.

जिल्हानिहाय थकबाकी

चंद्रपूर जिल्हा – घरगुती ग्राहकांकडुन १४ कोटी ५६ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी ४९ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन २ कोटी २५ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून २ कोटी ९६ लाख येणे आहे.

 

गडचिरोली जिल्हा -घरगुती ग्राहकांकडुन ५ कोटी ६५ लाख येणे आहे, तर वाणिज्यिक गाहकांकडुन ८१ लाख येणे आहे,औदयोगिक ग्राहकांकडुन १ कोटी ३ लाख थकबाकी वसुली येणे आहे, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून ३८ लाख येणे आहेत.

 

नोटीशीची मुदतही संपल्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे वर्षभरात या सर्व वर्गवारीतील थकबाकीदार ग्राहकांविरोधात सातत्याने वीजपुरवठा ख्ंडीत करण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग यांनी ३१ मार्च २०२३ नुसार दिलेल्या आदेशान्वये १ ऑगस्ट २०२३ पासून महावितरणच्या रोखीत वीजबिल भरण्याच्या कमाल रकमेवर मर्यादा आहे. महावितरणचे सर्व ग्राहक (लघुदाब कृषी वर्गवारी सोडून) यांना दरमहा कमाल मर्यादेत केवळ ५ हजार रुपयांपर्यंतचे वीजबील भरता येणार आहे. तसेच लघुदाब कृषी वर्गवारीतील ग्राहकांना वीजबिल रोखीत भरण्यासाठीची दरमहा कमाल मर्यादा १० हजार एवढी राहणार आहे.

 

महावितरणच्या वतीने वीजग्राहकांना www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजदेयकाचा भरणा करता येवू शकतो. या प्रणालीची कार्यपध्दती महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पध्दतीत ग्राहक वीजदेयकाचा भरणा क्रेडिट/डेबिटकार्ड, नेटबँकींग व युपीआय इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत करू शकतो. तसेच भारत बिल पेमेंट (BBPS) मार्फत देखील वीज बिल भरणा करता येऊ शकतो.

 

या व्यतिरिक्त महावितरणने रु.५,०००/- पेक्षा जास्त बिल असणाऱ्या सर्व लघुदाब ग्राहकांना RTGS/NEFT द्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी लागणारी आवश्यक ग्राहक निहाय बँकेच्या माहितीचा तपशिल वीजबिलावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. क्रेडिट कार्ड वगळता इतर सर्व पध्दतीने वीजबिल भरणा निशुल्क आहे. तसेच ऑनलाईन पध्दतीने देयकाचा भरणा केल्यास बिल रकमेच्या ०.२५ टक्के (जास्तीत जास्त रु. ५००/-) इतकी सवलत देखील देण्यात आलेली आहे.

दिवसेंदिवस वीजेचा वापर वाढतच आहे व महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वुसलीतून प्राप्त पैशामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते.

 

महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरणा अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागत आहे. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वीजखरेदी करते व वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते.

 

वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार आहे .

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!