Thursday, April 25, 2024
Homeचंद्रपूर शहरइतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा - सचिन राजुरकर

इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा – सचिन राजुरकर

ओबीसी अन्नत्याग आंदोलनाची दखल नाही

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – एकीकडे गेल्या काही दिवसांत मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन केले. दुसरीकडे या समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून ओबीसी नेते आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास त्यांनी कडाडून विरोध केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे अध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या अन्नत्याग उपोषणाला प्रशासनाने तिसऱ्या दिवशी दडपण्याचा प्रयत्न केल्यानंतर आज पाचव्या दिवशी पर्यंत प्रशासनाने रीतसर कानडोळा करत आहे. Maratha vs obc

 

राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी मराठ्यांच्या या मागणीला विरोध करत मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळू नये कारण ते सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या कमकुवत नाहीत, तसेच सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 मराठा समाजाचे आरक्षण नाकारलेले आहे असे म्हटले आहे.

 

शिवाय वास्तविक, मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र अलीकडेच दोन आठवड्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरंगे उपोषणाला बसले तेव्हा हा मुद्दा पुन्हा एकदा तापला.परंतु जरांगे यांची मागणी संविधानाच्या कक्षेत बसणारी नसून आम्ही संविधानिक मागणी करीत आहोत असे ओबीसी महासंघाने स्पष्ट केले.

 

दुसरीकडे मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी पाहता चंद्रपूरातील ओबीसी समाजातील लोकही मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.येत्या 17 सप्टेंबर ला ओबीसी समाज बांधव मोठया प्रमाणात महामोर्चा काढणार आहे.

 

या आंदोलनात मराठ्यांचे ओबीसीकरण करू नये ही मुख्य मागणी असून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी मराठा समाजाच्या उपोषण मंडपास भेट दिली व खुद्द ओबीसींचे मंत्री असताना ओबीसी समाजाच्या अन्नत्याग आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!