News34 chandrapur
चंद्रपूर : मूल तालुक्यातील चांदापूर येथील शेतशिवारात १४ फुट लांबीचा अजगर साप आढळून आला.अजगर १४ फुट लांब व २६ किलो वजनाचा होता. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे.
चांदापूर येथील नागरिकांनी संजीवन पर्यावरण संस्थेच्या सदस्यांना संपर्क करून माहीती दिली. संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य दिनेश खेवले आणि सर्पमित्र तन्मयसिंह झिरे यांनी चांदापूर येथे जाऊन शेतशिवारातील झाडावरून १४ फुट लांब व २६ किलो वजनाच्या अजगर सापाला अलगद पकडले. आतापर्यंत सापडलेला हा सर्वात मोठा अजगर आहे. याआधी तेरा फुट लांबीचा अजगर याच परिसरात झिरे यांनी पकडला आहे. अजगराची वनविभागा मध्ये नोंद करण्यात आली. त्यानंतर बफर क्षेत्रातील डोनी च्या जंगलात सुरक्षित ठिकाणी त्याला सोडण्यात आले.
अजगर सापाला सोडतांना वनरक्षक सूधीर ठाकुर, वनरक्षक पवन कुळमेथे, वनरक्षक खोब्रागडे, संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य तन्मयसिंह झिरे, दिनेश खेवले, अंकुश वाणी, प्रतीक लेनगुरे व शक्कीर जेंगठे उपस्थित होते.