Monday, May 27, 2024
Homeचंद्रपूर शहरमहाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटना चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी राहुल क्षीरसागर यांची नियुक्ती

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक संघटना चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी राहुल क्षीरसागर यांची नियुक्ती

युवा चेहऱ्याला संधी

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – २८ ऑक्टोबरला महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेची जवाहर विद्यार्थी गृह, सिविल लाईन नागपूर येथे विभागीय बैठक पार पडली या बैठकीला प्रामुख्याने प्रदेशचे अध्यक्ष तथा वर्धा जिल्ह्याचे खासदार मा. रामदासजी तडस साहेब, कोषाध्यक्ष गजानन नाना शेलार, महासचिव डॉ. भूषण कर्डीले, सहसचिव बळवंतराव मोरघडे, अतुल वांदिले,सहसचिव जयेश बागडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश देवतळे, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, माजी आमदार चरण वाघमारे, राज्य प्रसिद्धी प्रमुख गजानन उमाटे, विभागीय पदाधिकारी नंदकिशोर दंडारे, वैभव गोल्लर, विनायकराव तुपकर, महिला आघाडी विदर्भ संघटिका माधुरी तलमले, वंदना वनकर, प्रज्ञा बडवाईक, रमेश पिसे, किष्णाजी बेले, छबू वैरागडे, राजेंद्र झाडे, नयना झाडे, पुष्कर डांगरे व सर्व नागपूर विभागातील, जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष तथा जिल्यातील पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या बैठकी प्रसंगी नुकतेच भारताचे प्रतिनिधित्व करून तीन सुवर्ण पदक प्राप्त करणारे ओजस देवतळे यांच्या परिवाराला सन्मानित करण्यात आले, नागपूर पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉ. संजय पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला, नागपूर विभागीय उपसंचालक शिक्षण विभाग उल्हास नरळ साहेब यांचाही सत्कार करण्यात आला व बैठकीची सुरुवात करण्यात आली या बैठकीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये.

 

यावर विचारमंथन करण्यात आले, सोबतच भविष्यात येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तेली समाजाचे किमान ४ खासदार व 15 आमदारांना सर्वपक्षीय प्रतिनिधित्व मिळावे याकरिता सर्व तेली बांधवांनी एकत्रित येण्याचे आवाहन करण्यात आले तेली महाराष्ट्र तेल घाना महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

 

समाज हा विदर्भात फार मोठ्या संख्येने आहे येणाऱ्या काळात ओबीसीं आरक्षणासह प्रतिनिधित्वाला जर धक्का लागला तर तेली समाज एक ओबीसीच्या घटक म्हणून राज्यभर रस्त्यावर उतरून शांततापूर्ण आंदोलन करतील इत्यादी महत्त्वाच्या बाबीवर मंथन करण्यात आले. याप्रसंगी नागपूर विभागातील 200 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांच्या नवीन नियुक्त करण्यात आल्या या बैठकीला नागपूर विभागातील ५०० पेक्षा जास्त पदाधिकारी मिटींगला उपस्थित होते. यावेळी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते चंद्रपुरातील युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल क्षीरसागर यांना महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा चंद्रपूर महानगर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर विभागाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य यांनी केले तर संचालक नागपूर जिल्हा अध्यक्ष पुष्कर डांगरे व माधुरी तलमले यांनी केले तर आभार प्रदर्शन वंदना वनकर यांनी केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नागपूर कार्याध्यक्ष राजेश बारुतकर, रुपेश कुबडे, राजेश काळबांडे, विजय पाटील, अरुण तडस, राम जुमळे, गणेश वासुरकर, संकुल शहारे, आकाश लेंडे, दत्तु जीभकाटे, शालिनी तेलरांदे, मंगला महाजन, मंगला मस्के, निशा हटवार, जयश्री गभने, किरण बारई इत्यादी नागपूर विभागातील सर्व जिल्हा अध्यक्ष जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!