News34 chandrapur
चंद्रपूर – महिन्याभरापूर्वी वेकोली चंद्रपुर क्षेत्रात नव्या मुख्य महाप्रबंधक रुजू होताच त्यांनी बदलीचा सपाटा लावला आहे , मात्र दोन दिवसा अगोदार झालेल्या तडकाफडकी बदलीच्या निर्णयाला काही अधिकारी चांगलेच नाराज झाले आहे.
चंद्रपुर क्षेत्रातील शिवा प्रसाद, सचिन फुलझेले, निलाभ कुमार, पी.जी अश्विनी व व्हिक्टर कालाबंडी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे, नव्या मुख्य महाप्रबंधकांनी सध्या तरी अनेक अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतली नाही, मात्र अचानक त्यांनी बदल्यांचा निर्णय घेतल्याने अधिकाऱ्यात नाराजीचा सूर उमटला आहे.
कारण चंद्रपूर क्षेत्रात 3 उपक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या मात्र मुख्य महाप्रबंधक कार्यालय व दुर्गापूर उपक्षेत्रातील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली नाही, त्यामुळे याठिकाणी कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर मुख्य महाप्रबंधकांचे विशेष प्रेम आहे की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुख्य महाप्रबंधक कार्यालयातील कार्मिक अधिकारी मागील अनेक वर्षांपासून त्याठिकाणी कार्यरत आहे, अनेक महाप्रबंधक आजपर्यंत आले आणि गेले मात्र हे कार्मिक अधिकारी आजही कार्यालयातील खुर्चीला चिकटून बसले आहे, एका टेबलवरून दुसऱ्या टेबलवर त्या कार्मिक अधिकाऱ्यांची बदली होत आहे, एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले की बदली च्या निर्णयात मोजक्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली, या निर्णयामागे काहींनी महाप्रबंधक यांची दिशाभूल करीत आपल्या अधिकाऱ्यांना संजीवनी देण्याचे कार्य केले आहे.
अचानक झालेल्या या बदली सत्राने याचा सर्वात जास्त परिणाम कोळसा उत्पादनावर होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे