Monday, May 27, 2024
Homeग्रामीण वार्तातो गुरांना घेऊन जंगलात गेला आणि वाघ समोर आला

तो गुरांना घेऊन जंगलात गेला आणि वाघ समोर आला

गुरख्यास वाघाने केले ठार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चिमूर – गुरांना जंगलात चराईसाठी घेऊन जाणाऱ्या गुराख्याला दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना रविवारी 29 ऑक्टोबर ला घडली.

 

चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथे राहणारे 45 वर्षीय मधुकर धाडसे असे मृतकाचे नाव आहे.

दुपारच्या सुमारास विहिरगाव येथील गुराखी व गुरेढोरे मालक यांनी 8 जणांचा समूह बनवीत गुरे चराईकरिता विहिरगाव वनविभागातील कम्पार्टमेंट क्रमांक 859 मध्ये गेले.

 

त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने मधुकर वर हल्ला चढवीत त्याला ठार केले, सदरची माहिती वनविभागाला मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या चमूने मधुकर चा मृतदेह शवविच्छेदन करिता उपजिल्हा रुग्णालयात आणला, मृतक मधुकर हा विवाहित असून त्याला एक मुलगी आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!