Monday, May 27, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपूर RTO कार्यालयातील उभ्या वाहनाला आग

चंद्रपूर RTO कार्यालयातील उभ्या वाहनाला आग

उभ्या ट्रक ला भीषण आग, कारण अस्पष्ट

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – शहरातील शासकीय दूध डेअरी जवळ असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील उभ्या ट्रक ला 30 ऑक्टोबर ला रात्री भीषण आग लागली.

 

सोमवारी रात्री 8.30 ते 9 वाजता दरम्यान परिवहन विभागाने जप्त केलेल्या उभ्या ट्रक ला अचानक आग लागली, परिवहन विभागाला आग लागली अशी अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली, मात्र ती आग कार्यालयाला लागली नसून जप्त केलेल्या ट्रक ला लागली होती.

 

परिवहन विभागाच्या परिसरात नागरिकांची गर्दी जमली, तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत सूचित करण्यात आले सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.

आग कुणी लावली? की शॉर्ट सर्किट मुळे आग लागली याबाबत सध्या काही स्पष्ट झाले नाही. मात्र या आगीत परिसरातील अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले असून ते सुद्धा या आगीत स्वाहा झाल्याची माहिती आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!