News34 chandrapur
चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील मुख्य रसत्यावर विविध ठिकाणी वाहन कायमचे उभे ठेवून वाहतूकीत अडथळा निर्माण करणाऱ्या बेजबाबदार, कायदा भंग करणाऱ्या व्यक्ति विरूद्ध मोटर वाहन अधिनियमांच्या तरतूदींसह भारतीय दंड संहितेच्या कलम 283 अंतर्गत सुद्धा कारवाई होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
चंद्रपूर शहरात प्रशासना कडून वाहतूक नियंत्रण व सुव्यवस्था कायम ठेवन्याकरिता बरेच प्रयत्न करण्यात आले आहे, ज्यामध्ये प्रशासन द्वारे मुख्य मार्गाच्या दोनही बाजूला फुटपाथचे निर्माण, मार्गाच्या दोनही बाजूला पांढऱ्या रेशाने पार्किंगची जागा निश्चित करून वाहनांची रहदारी करिता रोड मोकळे करून देण्यात आले होते.
परंतु मागिल काही महिन्यापासून असे दिसून येत आहे की बरेच ठिकाणी फुटपाथ आणि पार्किंगच्या जागेवर कायमचे वाहन उभे ठेवून काही बेजबाबदार व कायदा भंग करणारे समृद्ध लोक / व्यवसायिक लोकांनी अतिक्रमण करून घेतले आहे आणि त्यामुळे मुख्य मार्ग असो किंवा गल्ली असो सर्व ठिकाणी वाहतूकीत इतक्या मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होउ लागला आहे की ज्यावरून शहरातील व चंद्रपूर शहराच्या बाहेर जाणान्या मुख्य मार्गांवर सुद्धा दिवसभर ट्रैफिक जाम ची दशा कायम दिसत राहते.
नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मुख्यमार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड आणि महात्मा गांधी रोड हया मेन रोड वर दोनही बाजूला प्राईवेट बस मालकांनी, टॅक्सी धारकांनी, वाहन शोरूम मालकांनी, वाहन रिसेल कारणारे व्यवसायिकांनी मोठे व्यवसायिक कॉम्पलेक्स मधे व्यवसाय करणारे गाळे धारकांनी, मेन रोड वर व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांनी चंद्रपूर शहर महानगर पालिका द्वारा चंद्रपूर शहरात रोड वर मार्किंग करून दिलेल्या पांढऱ्या रेशांच्या बाहेर आपली वाहने उभे ठेवून वाहतूकित अडथळा निर्माण केला आहे.
ज्यामुळे दिवसात सर्वसामान्य जनतेला रोड वर आपली वाहन चालविणे अवघड झाले आहे. इतकेच नव्हेतर जाम ची कायम स्थिति उदभवत असल्याने पायदळ जाणारे लोक सुद्धा त्रास भोगत आहे. अनेक ठिकाणी अव्यवस्थित पार्किंग असल्याने दररोज दूर्घटना होत आहे त्यात जीवहानि होण्याचे सुद्धा अनेक प्रसंग निर्माण झाले आहे.
हा गंभीर विषय आहे. सर्व सामान्य जनता आपले वाहन घेउन आता मुख्य मार्ग असो किंवा चंद्रपूर शहरच्या बाहेर जाणारे महामार्ग असो त्यावर आपले दुचाकी व चारचाकी वाहन चालवितांना घाबरतात कारण त्यांच्या वाहनांच्या येण्या-जाण्याचे मार्गच उरले आहे. सर्व ठिकाणी काही खास लोक आपले वाहन दिवसरात्र अव्यस्थितपणे लावून रोडचे त्यांनी कायमचे अतिक्रमण करून घेतले आहे. याबाबत अनेकांनी तक्रार केली आहे की नागपूर रोड वर विद्यानिकेतन शाळा पासून ते प्रियदर्शनी चौक पर्यंत आणि तिथून जटपुरा गेट आणि बंगाली कॅप कडे जाणारा मार्ग वर इतकेच नव्हेतर चंद्रपूर शहरच्या मध्य ठिकाणी कस्तुरबा रोड, मेन रोड हया मार्गावर बरेच लोक आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवतात आणि त्यांचा विरोध केल्यावर ते शिवीगाळ करून वाहतूक व्यवस्थेत आम्ही अडथळा निर्माण केल्यावरही आमच्या विरूद्ध प्रशासन काहीच करू शकत नाही अशी धमकी देण्याचे स्तरावर गेले आहे.
सर्व सामान्य जनता त्या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना जाब देण्याऐवजी आपला त्रास स्वतः भोगून शांत निघून जाते परंतू कधी कधी आपसात मारामारीची परिस्थिति निर्माण होते ज्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा सुद्धा प्रश्न निर्माण होतो.
या परिस्थितीतून कायमची मुक्तता मिळण्याकरिता आपल्या मार्फत अधिकाऱ्यांनी अनेकदा प्रयत्न केले असेल परंतू स्थिति मधे काहीही सुधारणा होत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. आपल्या कडे शासनाने कायदा व सुव्यवस्था लागू करण्याची जबाबदारी दिली आहे आणि कायद्यात मोटर वाहन अधिनियम अंतर्गत दंड व सक्तीचे प्रयोजन, रोड वर अतिक्रमण केल्यास दंड व सक्तीचे प्रयोजन सह वाहन जप्ती करण्याचे सुद्धा अधिकार दिले आहे तर त्याचे योग्यपणे वापर होणे गरजेचे आहे.
तसेच वारंवार सूचना देउन सुद्धा जसे मुख्यमार्ग आणि महामार्ग वर अव्यवस्थितपणे वाहन लावून अडथळा निमार्ण करणाऱ्या किंवा मुख्यमार्ग व महामार्ग वर मनपाकडून पांढया रंगाने चिन्हित करून दिलेल्या पार्किंग झोनच्या बाहेर दिवसरात्र आपले वाहन कायमचं
उभे ठेवणाऱ्या लोकांविरूद्ध सक्तीची कारवाई करण्याकरिता भारतीय दंड संहितेच्या कलम 283 मधे सुद्धा आपणास असे अधिकार देण्यात आले आहे की ज्यावरून आपण सार्वजनिक मुख्य मार्ग, महामार्ग वर अतिक्रमण करणाऱ्या लोकांविरुद्ध जप्तीची कारवाई करू शकतात.
तरी सर्व सामान्य जनतेचा हा प्रश्न आम्ही आपल्या समक्ष ठेवून आपणास विनंती करू इच्छितो की आपण चंद्रपूर शहर च्या सर्व मुख्य रस्त्यांवर आपली वाहने अव्यस्थितपणे किंवा दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणारे लोका विरूद्ध 7 दिवसात कडक मोहीम राबवून त्यांच्या विरुद्ध भा.दं.वि. कलम 283 अंतर्गत कारवाई करत त्यांचे वाहन जप्तीची कठोर दंडात्मक कारवाई करावी जेणेकरून प्रशासनाने सामान्य लोकांच्या येण्या-जाण्याकरिता उपलब्ध करून दिलेल्या सार्वजनिक रोड वर आपले वाहन दिवसरात्र उभे ठेवून अतिक्रमण करणाऱ्या लोकांमधे नियमांची व कायद्याची धाक बसेल आणि आपल्या शहरात वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत थोडी फार सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे.
ह्या विषयाचे स्मरणपत्र दिनांक 27 ऑक्टोबर ला जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर व अतिरिक्त पोलीस अधीक्षक ह्यांना देण्यात आले, ह्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि ह्या विषयावर एक अधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाल्याचे चर्चे दरम्यान सांगण्यात आले व येत्या काही दिवसात ह्या वाहूतुक अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने कडक कायदा करण्याचा अध्यादेश काढण्यात येईल व मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येईल असे आश्वासन शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांना देण्यात आले.
निवेदन सादर करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,युवक अध्यक्ष अभिनव देशपांडे, तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोस्कुला, संभाजी खेवले, राहुल वाघ तसेच शहरातील पदाधिकारी उपस्थित होते.