चंद्रपुरात मनसेने काढली आरोग्यव्यवस्थेची तिरडी

News34 chandrapur

चंद्रपूर – नुकत्याच घडलेल्या नांदेड, ठाणे, नागपूर येथील दुर्दैवी घटनेनंतर आरोग्य व्यवस्था किती हाल आहे हे स्पष्ट झाले आहे. यातच चंद्रपूर येथील शासकीय महाविद्यालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने उपाचाराअभावी परिचारिकेचा मृत्यू झाला.
यामुळे कुपोषित अवस्थेत पडलेल्या शासकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेविरोधात मनसे चंद्रपूर तर्फे आरोग्य व्यवस्थेची तिरडी काढत निषेध नोंदविण्यात आला व यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली. Realme चा 5G मोबाईल फक्त 11 हजार 999 रुपयात, आजच खरेदी करा amazon वर

 

तिरडी वर औषधांचा हार चढवत प्रशासनाच लक्ष वेधण्यात आले, तसेच यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शासनाकडे अनूपस्थित राहणाऱ्या डॉक्टरांवर कडक शासन करावे, औषधांचा पुरवठा रुग्णांची वाढती संख्या पाहून करावा, गेली दोन वर्षापासून होत असलेली औषध पुरवठ्याची मागणी त्वरित पूर्ण करण्यात यावी, डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची, कामगारांची शेकडो रिक्त पदे त्वरित भरावी, ऑपरेटिंग एक्स-रे मशीन सुरू करावी, रखडलेल्या यंत्रांची खरेदी अती तातडीने करण्यात यावी, सोनुग्राफी करीता महिने महिन्याची तारीख रुग्णांना न देता, त्यावर त्वरित उपययोजना करावी, कर्मचाऱ्यांचे वर्षभरापासून अधिष्ठाता यांचे कार्यालयात रखडलेले उपचाराचे बिल त्वरित अदा करण्यात यावे, खाटांची संख्या वाढविण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या, विविध फलक दाखवीत निद्रावस्थेत असलेल्या शासनाच्या व सरकारच्या ढिम्म कारभाराचा यावेळी निषेध केला.

 

यावेळी उपअधीक्षक यांचे कार्यालय गाठत खाली असलेल्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तब्बल अर्धा तास ठिय्या मांडत अधिकाऱ्यांना बोलावून चर्चा केली. यावेळी शासनाकडून खरेदीत, भरीत प्रक्रियेत, व औषधी पुरवठा करण्यात होणारी दिरंगाई यामुळे अनेक अडचणींना स्थानिक अधिकाऱ्यांना व डॉक्टर यांना समोर जावे लागत आहे हे स्पष्ट झाले. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अवगत करून आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी दिले.

 

सदर आंदोलनात कामगार सेना जिल्हाध्यक्ष रविष सिंह,व्यापारी सेना जिल्हाध्यक्ष महेश शास्त्रकार, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार,विधीसेना जिल्हाध्यक्ष मंजुषा लेडांगे,शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष आनंद बावणे, जनहित सेना जिल्हाध्यक्ष सुनील गुडे,तालुअक अध्यक्ष प्रकाश नागरकर,शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसे जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन टेकाम, अक्षय चौधरी, राज वर्मा,वर्षा भोमले, युगल ठेंगे, नितेश जुमडे, करण नायर, मयुर मदनकर, कार्तिक खंगार,सुयोग धनवलकर, राकेश पराडकर, तुषार येरमे,पियुष धुपे,असलम शेख, अभी उमरे, विनोद रेब्बावार,ऋषि बालमवार, कार्तिक खंगार व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Sharing Is Caring:

Leave a Comment

error: Content is protected !!