Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीणचंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लात गुराखी ठार

चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्लात गुराखी ठार

मूल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

मूल (गुरू गुरनुले): गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने झडप घेवुन ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 घडली. बंडु विट्ठल भेंडारे वय 60 रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे.

मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे आज 20 ऑक्टोबर ला गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते, दरम्यान दुपारच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील नागरीकांना संशय आल्याने त्यांनी जंगलाच्या दिशेने गेले.

 

यावेळी बडु विट्टल भेंडारे यांना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना उघडकीस आली. घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचुन पंचनामा करीत आहे.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular