Thursday, April 25, 2024
Homeक्रीडाचंद्रपुर मनपात अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र, मनपाने केली पोलिसात तक्रार

चंद्रपुर मनपात अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र, मनपाने केली पोलिसात तक्रार

अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने पोलिसांत तक्रार मनपा आरोग्य विभागाची कारवाई

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर –  मनपा आरोग्य विभागात झालेल्या कंत्राटी भरतीदरम्यान अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून दिशाभूल व फसवणुक केल्याबद्दल दोन उमेदवारांविरुद्ध महानगरपालिकेद्वारे सिटी पोलीस स्टेशन गांधी चौक येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

जुन महिन्यात मनपा आरोग्य विभागातर्फे एएनएम या पदासाठी कंत्राटी तत्वावर १८ पदे भरण्यासंबंधी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती. यात अनेक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.पात्र होण्यास इतर कागदपत्रांसोबतच अनुभव प्रमाणपत्र सुद्धा मागविण्यात आले होते. यात शितल सिद्धार्थ मेश्राम यांनी सीएचएल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चंद्रपूर यांचे तर प्रगती शंकर ढोले यांनी सिम्स हॉस्पिटल,बजाज नगर नागपुर येथे काम केले असल्याबाबत अनुभव प्रमाणपत्र सादर केले.

 

मात्र मनपाद्वारे सदर कागदपत्रांची वैधता तपासण्यास या हॉस्पिटल्सला संपर्क केले असता सदर नावाच्या उमेदवाराने येथे काम केले नसल्याचा अहवाल प्राप्त झाला. नौकरी मिळविण्यास अनुभवाचे खोटे प्रमाणपत्र सादर करून चंद्रपूर महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणुक केल्याने आरोग्य विभागामार्फत सिटी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

रिक्त पदांची अथवा कंत्राटी पदांची भरती दरम्यान कुठल्याही प्रकारचे खोटे कागदपत्रे सादर करून उमेदवारांनी आपल्या भविष्याचे नुकसान न करून घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!