Sunday, April 21, 2024
Homeक्रीडाडॉक्टरांची पदे कधी भरणार? कांग्रेस आक्रमक

डॉक्टरांची पदे कधी भरणार? कांग्रेस आक्रमक

कांग्रेस ने दिले सिव्हिल सर्जन ला निवेदन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur गुरू गुरनुले

मुल – शासनाचे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत असून रुग्णांचे बेहाल होत आहेत. आजच्या स्थितीत एका दिवशी हिवताप व विषमज्वर असे 890 रुग्ण उपचारासाठी दाखल होत असल्याने रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेनुसार अपुरी असल्याचे दिसून येत आहे.

 

यामधे मंजूर पदे ४८ भरलेली पदे ३२ कंत्राटी ५ असून १३ पदे रिक्त असल्याचे प्रत्यक्ष दिसून आले. मुल तालुक्यात सर्वाधिक गावांची संख्या लक्षात घेता उपजिल्हा मंजूर केले. परंतु उपजिल्हा रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात असल्याने रुग्णांवर विविध आजारांवर उपचार करणारे डॉक्टर पुरेसे नाहीत. तालुक्यात मोठे उपजिल्हा रुग्णालय असून देखील आय.सी. यु.ची सोय नाही. त्यामुळे भरती केल्यानंतर लगेच त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी त्यांना रेफर केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत.

 

औषधांचा साठा पुरेसा नाही तसेच रुग्णालयात बेसिक मेडीसिन नाही. जे इंजेक्शन उपलब्ध आहेत ते पुअर कंडीशनचे असल्याने रुग्णांना तात्काळ फायदा होत नाही. आक्सिजन सुविधा बरोबर नाही. ती गरजेनुसार वेळेवर उपलब्ध केल्या जाते. एटीबायटिक नाही. सोनोग्राफी सेवा असून हप्त्यात फक्त दोनच दिवस तपासणी होत आहे.

 

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची वेतन अडले

पहिलेच कंत्राटी डाक्टर कर्मचारी यांची संख्या कमी असून मागील चार महिन्यापासून वेतन दिल्या जात नसल्याचे कंत्राटी कर्मचाऱ्यांची दमशक झाली आहे. याबाबत मुल तालुका कांग्रेस,महिला कांग्रेस,युवक काँग्रेस,शहर कांग्रेस वतीने आरोग्य सेवेबाबत लेखी पत्र देऊन अपुरे कर्मचारी त्वरित भरण्यात यावे. औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध करावे. आय सी.यु. युनिट नियमित ठेवण्यात यावे. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सोई तात्काळ करावे.

 

शक्यतोवर चंद्रपूरला रेफर करणे टाळावे. रुग्णांवर इथेच उपचार करुन त्यांचे समाधान करावे. नियमित एक्सरे टेक्निशियन ठेवावे. इत्यादी मागण्या बाबत चंद्रपूर येथील शल्य सिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांना तात्काळ बोलावून निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा रुग्णालय येथील डॉ.रामटेके, डॉ कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ. लाडे.उपअधीक्षक डॉ.प्रफुल लांडेकर , बालरोग तज्ञ डॉ.मेंढे उपस्थित होते.

 

समस्यांचे व मागण्यांचे निवेदन देताना कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, तालुका कांग्रेस अध्यक्ष गुरु गुरनुले, शहर अध्यक्ष सुनील शेरकी,महिला तालुका अध्यक्षा रुपाली संतोषवार,माजी नगर सेविका लीना फुलझेले, युवक अध्यक्ष पवन निलमवार,शहर अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार,महिला शहर अध्यक्ष नलिनी आडपवार, बंडू गुरनुले, सुरेश फुलझेले, सरचिटणीस संदीप मोहबे, आशिष रामटेके यांचे उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

 

ग्रामीण आरोग्य सेवा कोलमडली

ग्रामीण विभागातील जिल्हा परिषदे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधेच्या बाबतीत प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र अपुरे कर्मचारी असल्याच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या असून तालुक्यातील आरोग्यसेवा निकामी झाल्याने चित्र दिसून येत आहे.

 

ग्रामीण भागातही बाहेरून औषधी आणायला सांगतात. मौजा बेंबाल प्राथमिक आरोग्य केंद्राची काही दिवसापूर्वी गावाच्या दृष्टीने ग्रामीण आरोग्य सेवेसाठी नवीन वास्तू उभारण्यात आली.गेल्या सहा दिवसापूर्वी सायंकाळी ६ वाजता बेंबाड प्राथमिक आरोग्य केंद्रात डीलव्हरीची केस नेली असता तिथे एकही डाक्टर, नर्स ,कर्मचारी उपलब्ध नाही. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांचेकडे तेथील सरपंच चांगदेव केमेकर यांनी संपर्क साधून माहिती दिली असताना सुद्धा त्या महिलेवर उपचार होऊ शकला नाही ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामीण आरोग्य सेवाही आक्सिजनवर राबविली जात आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!