Thursday, May 23, 2024
Homeक्रीडाखासदार पाटील माफी मागा, चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनांचे निषेध आंदोलन

खासदार पाटील माफी मागा, चंद्रपुरात डॉक्टर्स संघटनांचे निषेध आंदोलन

खासदार पाटील माफी मागा

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना खासदार हेमंत पाटील यांनी टॉयलेट स्वच्छ करायला लावल्याने राज्यात पाटील यांचा डॉक्टरांनी काळी फित लावत निषेध नोंदवीला.

नांदेड शासकीय वैद्यकीय रुग्णालयात मृत्यूच्या तांडवानंतर खासदार हेमंत पाटील यांनी डिन एस.आर. वाकोडे यांना टॉयलेट्स ची स्वच्छता करायला लावली, यावेळी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी व्हिडीओ बनवीत व्हायरल सुद्धा केला.

 

या घटनेमुळे डॉक्टर संघटनांनी खासदार पाटील विरोधात एल्गार पुकारत त्यांचा निषेध केला.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेच्या वतीने काळी फित लावत पाटील यांचा निषेध नोंदवला.

 

निवासी, शिकाऊ डॉक्टर्स व विविध संघटनेच्या डॉक्टरांनी खासदार पाटील यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी केली आहे, खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींचे हे कृत्य संघटना खपवून घेणार नाही अशी माहिती डॉक्टर संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
यावेळी संघटनेच्या अध्यक्ष डॉ. तेजस्विनी चौधरी, रोहित होरे, प्रशांत मगदूम, ऋतुजा गांगुर्डे आदींची उपस्थिती होती.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!