Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुरात रावण दहनाला विरोध

चंद्रपुरात रावण दहनाला विरोध

पोलीस बंदोबस्तात पार पडले रावण दहन

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – विजयादशमीच्या दिवशी मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घुस येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास आदिवासी समाजबांधवांनी केलेल्या विरोधानंतरही रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉट येथे रावणदहन पार पडले. तब्बल दहा ते अकरा तास पोलिस ठाण्यात ठेवलेल्या आदिवासी बांधव महिला पुरूषांना पोलिसांनी रात्री सोडले. पोलिस स्टेशन पासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत पैदल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला.
मंगळवारी चंद्रपूर तालुक्यातील घुग्घूस शहरात बहादे प्लॉटमध्ये विजयादशमीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. याकरीता रावणाची प्रतिकात्मक प्रतिमा सकाळी तयार करण्यात येत होती.

घुग्घूस शहरातील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी येऊन रावण दहनास प्रचंड विरोध केला. रावण हे आदिवासी समाजाचे दैवत आहेत. त्यांचे दहन करण्यता येत असल्याने आदिवासी समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे रावणदहन करू नये अशी आदिवासी समाजाने भूमिका घेतली. तसेच शासन, प्रशासन, नगर परिषद, पोलिस स्टेशन व मंत्री महोदयांना निवेदन देऊन रावणदहनला परवानगी देण्यात येवू नये अशी मगाणी करण्यात आली होती. सकाळी आदिवासी बांधवांनी रावणदहनाला विरोध करीत घुग्गुस शहरात निषेध मोर्चा काढला. दिवसभरतणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये याकरीता घुग्घूस पोलिसांनी घटनास्थळी येऊन शंभरावर आदिवासी बांधव, मुलामुलींना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यांची भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यातच आली होती. शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण होऊ नये दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करून चोख पोलिस बंदोस्त ठेवला होता.

 

आदिवासी बांधवांच्या विरोधानंतर घुग्घूस येथील रावणदहन होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दिवसभर आदिवासी बांधव पोलिस ठाण्यात स्थानबध्द असल्याने रावणदहन विरोधाचे वातावरण शांत झाले होते. त्यामुळे सायंकाळी रावणदहनाची बहादे प्लॉटवर तयारी करण्यात आली. बहादे प्लॉटवर रावणाची प्रतिमा उभी करण्यात आली. सायंकाळ पासून त्या ठिकाणी नागरिकांची गर्दी झाली. पोलिस बंदोबस्तात रात्री सव्वानऊच्या सुमारास बहादे प्लॉटवर उभारण्यात आलेल्या प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले. दिवसभर पोलिस ठाण्यात ठेवलेलया शंभरावर आदिवासी महिला पुरूषांना रात्री सोडण्यात आले.

 

महिलांना आठच्या तर नऊच्या सुमारास पुरूषांना सोडण्यात आले. त्यांची दिवसभरात भोजनाची व्यवस्था पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. आदिवासी बांधवांना दहा ते अकरातासांनी रात्री सोडल्यानंतर पोलिस स्टेशनपासून तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यापर्यंत त्यांनी पैदल मार्च काढला. या ठिकाणी एका छोटेखानी सभेची आयोजन करून शासन प्रशासन यांच्या विषयी संताप व्यक्त करीत रावणदहनाच्या घटनेचा निषेध केला.

यावेळी आदिवासी बांधवांनी, रावणदहन होऊ नये तसेच ही प्रथा बंद व्हावी याकरीता आदिवासी बांधवांनी शासन प्रशासन नगर पालिका, पोलिस स्टेशन तसेच घुग्घूस दशहरा उत्सव समितीला लेखी निवेदन देऊन रावणदहन करू नये तसेच प्रशसान परवागनी देऊ नये अशी मागणी केली होती.

 

रावण हे आदिवासी समाजाचे दैवत असल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. गावात तंटे भांडण होण्याची शक्यता असते. त्यामुळे रावणदहनाला परवानगी देऊ नये ही आमची मागणी आहे. परंतु या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. शांतता व सुव्यवस्था ठेवण्याकरीता आम्हाला दिवभर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यामध्ये लहानमुलेही होती. आमच्या विरोधानंतरही झालेल्या रावणदहन घटनेचा निषेध व्यक्त करीत रावणदहन प्रथा बंद करावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी यावेळी केली.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular