Wednesday, April 24, 2024
Homeचंद्रपूर शहरबाबूपेठ येथील पुरातन विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत आढळला युवकाचा मृतदेह

शहरातील पुरातन विहिरीवर सुरक्षा जाळी बसवा - राजू कुडे

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – मागील 2 दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवकाचा बाबूपेठ येथील पुरातन विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

शहरातील बाबूपेठ मधील डॉ. आंबेडकर नगर, माता चौक येथे राहणारा 24 वर्षीय आकाश पाल असे त्या मृत युवकाचे नाव आहे. आकाश बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा दिली होती.

 

बाबूपेठ भागातील सोनामाता मंदिर जवळ पुरातन काळातील विहीर आहे, मात्र त्या विहीरिला सुरक्षा जाळी नसल्याने हा प्रकार घडला, ही घटना प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी केला आहे.

 

आकाश याचा तोल गेल्याने तो विहिरीत पडला असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, पोलीस व मनपा प्रशासनाने आकाश चा मृतदेह बाहेर काढला.

 

यापूर्वी सुद्धा या पुरातन विहिरीत असे प्रकार घडलेले आहे, प्रशासनाने या विहिरीवर तात्काळ सुरक्षा जाळी लावण्याचे काम करावे अन्यथा भविष्यात अश्या घटना निश्चित वाढणार, पाल कुटुंबाने कमविता मुलगा गमावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

प्रशासनाने आकाश च्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राजू कुडे यांनी केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!