Thursday, May 23, 2024
Homeचंद्रपूर शहरचंद्रपुरातील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

चंद्रपुरातील अपघाताचा थरारक व्हिडीओ व्हायरल

भरधाव वेगात असणारी वाहतूक चिंतेचा विषय

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – चंद्रपूर शहरातील वाहतुकीने सतत कोंडलेल्या जटपुरा गेटवरील अपघाताचा थरारक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे, या व्हिडीओ मध्ये भरधाव वेगात असलेल्या ऑटोने 65 वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली आहे.

या व्हायरल व्हिडिओत 65 वर्षीय इसम रस्त्यावरून पलीकडे जात असताना त्यांना भरधाव वेगात येत असलेल्या ऑटो ने जोरदार धडक दिली, या धडकेत 65 वर्षीय प्रकाश खोडे राहणार जलनगर हे गंभीर जखमी झाले आहे.

 

चंद्रपूर शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे, मात्र यावर वाहतूक विभागाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असून शहरातील भरधाव वेगात चालणाऱ्या वाहनांवर कारवाई फक्त नावापुरती होत असल्याचा आरोप वारंवार वाहतूक विभागावर लागत आहे.

 

विशेष बाब म्हणजे शहरातील विविध भागात लागलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कंट्रोल रूम हे चंद्रपूर वाहतूक विभागात आहे.

RELATED ARTICLES

Recent News

Most Popular

error: Content is protected !!