News34 chandrapur गुरू गुरनुले
मुल – मुल तालुक्यातील मौजा जूनासुरला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सेवेत असणारा शिक्षक जी एन. कुळमेथे हा शिक्षक चक्क दारू ढोसून कर्तव्यावर आला असल्याचे प्रत्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीला आढळून आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शाळेत उपस्थित नव्हते. असे भेट देनाऱ्यानी सांगितले.
याबाबतची माहिती मुल पंच्यायत समितीचे गट विकास अधिकारी यांना मोबाईल वर देण्यात आली असून दारूच्या नशेत असणाऱ्या शिक्षकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून ज्ञान दानाचे कार्य करणारा शिक्षक लहान विद्यार्थ्यांना काय घडवणार आणि विद्यार्थी सुद्धा अशा शिक्षकाकडून कोणत्या ज्ञानाची अपेक्षा करणार अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये केली जात असून पोलिस व प्रशासन काय कारवाई करते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
याबाबत गट विकास अधिकारी यांनी केंद्र प्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना चौकशी करीता पाठविले असून चौकशी अहवाल प्राप्त होताच प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे सांगितले.