Thursday, December 7, 2023
Homeचंद्रपूरचंद्रपुरात अस्थिविसर्जन करतेवेळी घडली मोठी दुर्घटना

चंद्रपुरात अस्थिविसर्जन करतेवेळी घडली मोठी दुर्घटना

चंद्रपूर बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे व त्यांच्या एकुलत्या एक मुलाचा समावेश

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

विसापूर ( चंद्रपूर ): बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम झित्राजि पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी निधन झाले होते. त्यांचे अस्थिविसर्जन आज रविवार ( दि.१९ ) दुपारी २ वाजता दरम्यान वर्धा – इराई संगमावर गेले. दरम्यान मुलगा व भाचा नदीच्या प्रवाहात बुडत होते.त्यांना वाचविण्यासाठी उपसभाती गोविंदा पांडुरंग पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली.दोघांना वाचविण्याच्या प्रयत्नात तिघानाही वर्धा नदीपात्रात जलसमाधी मिळाली. ही मनाला चटका लावणारी व ह्रदयदायक घटना बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) जवळ वर्धा – इराई नदीच्या संगमावर घडली.

 

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव ( पोडे ) येथील राहणारे व चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पांडुरंग पोडे ( ४७), त्यांचा एकुलता मुलगा चेतन गोविंदा पोडे ( १६ ) व त्यांचा भाचा गणेश रवींद्र उपरे ( १७) असे वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळालेयाची नावे आहेत.

 

गोविदा पोडे हे बल्लारपूर पंचायत समितीचे देखील माजी सभापती होते. एकाच कंटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्यामुळे पंचक्रोशित शोककळा पसरली आहे. वर्धा नदी पात्रात कुटुंबातील सदस्यां समोर तिघे वाहून गेल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान शोध मोहिमेत सायंकाळी ५.४५ वाजता गोविंदा पोडे यांचा मुलगा चेतन पोडे याचे प्रेत नावाड्यानी बाहेर काढले.अन्य दोघांच्या प्रेताचा शोध मोहीम सुरु आहे.
नांदगाव ( पोडे ) येथील गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी वृदापकाळाने निधन झाले होते.

 

आज रविवारी त्यांच्या अस्थिविसर्जन करण्यासाठी कुटुंबीय वर्धा – इराई नदीच्या संगमावर दुपारी १ वाजता गेले होते. पूजा अर्चना करून अस्थी विसर्जन करण्यात आले. त्यावेळी चेतन पोडे व गणेश उपरे हे नदी पात्राच्या पाण्यात पोहत होते.त्यावेळी गोविंदा पोडे यांनी दोघांनाही पाण्याच्या बाहेर या,म्हणून आवाज दिला.त्यावेळी ते बाहेर निघत असताना वाहत्या पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले.

 

मुलगा व भाचा यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदी पात्रात उडी घेऊन त्यास वाचविण्याचा भरपूर प्रयत्न केला.मात्र ते देखील कुटुंबातील अन्य सदस्यासमोर वाहत्या पाण्याचा प्रवाहात वाहून गेले.
या घटनेची माहिती होताच चंद्रपूरचे एस.पी.रवींद्रसिहं परदेशीं, बल्लारपूर पोलीस निरीक्षक निरिक्षक उमेश पाटील, चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिहं राजपूत, बल्लारपूरच्या तहसीलदार डा.कांचन जगताप आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

 

दोघांचे प्रेत बाहेर काढले

चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे,त्यांचा मुलगा चेतन पोडे व भाचा गणेश उपरे यांना वर्धा नदी पात्रात जलसमाधी मिळाली. या दुर्दैवी घटनेतील मृतक गोविंदा पोडे यांच्या मुलाचे प्रेत शोध मोहिमे दरम्यान सायंकाळी ५. ४५ वाजता चेतन याचा तर सायंकाळी ६.४५ वाजता भाचा गणेश उपरे यांचे प्रेत बाहेर काढण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular