Wednesday, November 29, 2023
Homeचंद्रपूर ग्रामीणक्रिकेटचं काय घेऊन बसलाय? तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा नेता करतोय अनोखे आंदोलन

क्रिकेटचं काय घेऊन बसलाय? तुमच्या मूलभूत प्रश्नांसाठी हा नेता करतोय अनोखे आंदोलन

बीआरएसच्या लक्षवेधी आंदोलनाकडे जिल्हाचे लक्ष : काँग्रेसच्या बालेकिल्लात भूषण फुसे यांचा एल्गार

- Advertisement -
- Advertisement -

News34 chandrapur

चंद्रपूर – महाराष्ट्र-तेलंगणाला जोडणाऱ्या गोंडपिपरी -पोडसा राज्यमार्गावरील धाबा -गोंडपिपरी मार्गाचे काम मागील पाच वर्षांपासून संथगतीने सुरु आहे. अद्यापही काम पूर्णतःवास गेलेले नाही. या मार्गावरून प्रवास करणे जीवघेणे ठरत आहे. या मार्गाच्या प्रश्नाला घेऊन बीआरएसचे नेते भूषण फुसे सोमवारला अनोखे आंदोलन करीत आहे. या आंदोलनाकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. विशेष म्हणजे हा मार्ग राजुरा विधानसभा क्षेत्रात येतो. भुसे यांनी पुकारलेला एल्गार विद्यमान आमदारांना चांगलाच झोमणारा ठरणार आहे.

 

पाच वर्षांपूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धाबा गोंडपिंपरी मार्गाचे भूमिपूजन केले.

 

आज पाच वर्षे झाले तरी बारा कि.मी. अंतराच्या हा मार्ग अद्यापही पूर्णत्वास गेलेला नाही. या मार्गावर अधून मधून अपघाताच्या घटना घडत असतात. अपघाताच्या घटना काहींना जीव गमावा लागला. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. या मार्गाला घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासना संदर्भात कमालीचा संताप जनतेत दिसून येत होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधीनी ठोस पाऊल उचलले नाही. अश्यात बीआरएसचे नेते भूषण फुसे या मार्गाचा प्रश्न घेऊन उदयाला ( सोमवार ) आंदोलन करीत आहेत. धाबा बसस्थानक परिसरात हे आंदोलन होत आहे. या आंदोलन चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने जनता सहभागी होणार असल्याचे फुसे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
spot_imgspot_imgspot_imgspot_img
- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular